80 रुपये उधार घेऊन झाली लिज्जत पापडची सुरुवात, पहिली कमाई फक्त 50 पैसे, आज सर्वत्र आहे मागणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
लिज्जत पापड हा ब्रँड आज प्रसिद्ध ब्रँड आहे. या ब्रँडची सुरुवात फक्त 80 रुपयांच्या गुंतवणुकीने झाली होती. सात महिलांनी मोकळ्या वेळेत पापड बनवायला सुरुवात केली होती. त्यांची पहिली कमाई फक्त आठ आणे होती. मात्र, नंतर काम वाढल्याने या महिलांनी सहकारी संस्था नोंदणीकृत करून घेतली. (ऋतु राज, प्रतिनिधी, मुझफ्फरपूर)
advertisement
गुजरात राज्यातील सात महिलांनी आपला मोकळा वेळ घालवण्यासाठी लिज्जत पापड बनवण्यास सुरुवात केली होती. त्यांनी नातेवाइकांकडून 80 रुपये उसने घेतले आणि नंतर उडीद डाळ, हिंग, मसाले इत्यादी खरेदी केले. तसेच घराच्या गच्चीवर पापड बनवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी एकूण 5 पाकिटे पापड बनवले. ते बाजारात विकले. त्यावेळी त्यांना फक्त 50 पैसे मिळाले.
advertisement
advertisement
advertisement


