धाराशिव : वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा आह. बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. आज सर्वत्र दर्श पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा बैलपोळा सण साजरा केला गेला. धाराशिवमध्येही हा बैलपोळ्याचा सण साजरा केला गेला. हा बैलपोळा सण का आणि कसा साजरा केला जातो, हेच आपण जाणून घेऊयात.
advertisement
बैलपोळ्याच्या दिवशी सर्व देवतांना नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच बैलांची शिंगे रंगवली जातात. बैलांना रंग लावला जातो किंवा बैलांवरती झुल पांगरली जाते. तसेच बैलांच्या शिंगांना फुगे बांधले जातात. बैलांना साज चढवण्यात येतो. त्यांच्या पायात तोडे, गळ्यात घुंगरांची माळ, असा दिमाखदार साज केला जातो. बळीराजाचा लाडका सर्जा म्हणजेच बळीराजाचं सर्वस्व आहे. त्यामुळे अत्यंत आनंदात हा सण साजरा केला जातो.
साताऱ्यातील कारागृहातील कैद्यांकरिता किर्तनाचा कार्यक्रम, उपक्रमाची महाराष्ट्रात होतेय चर्चा, VIDEO
हिंदू धर्म संस्कृतीनुसार बैलपोळा म्हणजे शेतकरी आणि बैल यांच्या अनन्यसाधारण प्रेमाचा सण आहे. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपुलकीचा, वात्सल्याचा हा बैलपोळा सण धाराशिवमध्येही उत्साहात साजरा केला गेला.
मुंबईत ढोल पथकाच्या टीमचं कौतुकास्पद कार्य, पथनाट्याच्या माध्यमातून करताय जनजागृती, काय आहे विषय?
बैलपोळा सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलासाठी उपवास धरतो. बैलांना आंघोळ घालून बैलांची शिंगे रंगवली जातात. बैलांना रंगवले जाते, बैलांना साज सजवण्यात येतो, गावातून बैलांची मिरवणूक काढण्यात येते. तसेच मिरवणुकीतून मिरवून आणलेल्या बैलाची पूजा केली जाते. त्याला ओवाळले जाते आणि त्याला पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतरच बळीराजा आपला उपवास सोडतो.