कर्करोगानं गाठलं पण जिद्द सोडली नाही
केशरची शेती ही मुख्यत: काश्मीरमध्ये केली जाते. परंतु आता काश्मीरसह महाराष्ट्रातील इतर ठिकाणी देखील केशर पिकवलं जातंय. तळेगाव दाभाडे परिसरात राहणाऱ्या गौतम राठोड याचं शिक्षण बी. कॉम पर्यंत झालं आहे. ते यापूर्वी गॅरेज चालवत होते. हे करत असतानाच त्यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यात त्यांची उजवी किडनी निकामी झाली आणि ती काढावी लागली. त्यामुळं अवजड कामं करणं त्यांना शक्य नव्हतं. तेव्हा त्यांनी वेगळं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
फळांचं मार्केट होणार जाम, आता पिवळ्या 'ड्रॅगन'ने केली एंट्री, पाहा कशी होतेय शेती?
केशर शेतीची कल्पना कशी सुचली?
नातेवाईकाने पाठवलेला केसर शेतीचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी हीच शेती करण्याचा निर्णय घेतला. मग या शेतीवर संशोधन करायला सुरुवात केली. काश्मीरमध्ये जावून केशर शेतीची माहिती घेतली. तसेच विविध कार्यशाळांतून केशर लागवडीचे प्रशिक्षण घेतले. त्यातून छतावरील एका बंदिस्त प्लॉटमध्ये केशरची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इमारतीच्या छतावर व्हर्टीकल फार्मिंगद्वारे सुमारे दीड एकर जमिनीच्या समतूल्य केशर लागवडीसाठी वातावरण तयार केले, असे राठोड सांगतात.
साडेपाच वर्षाच्या मनस्वीचा वर्ल्ड रेकॅार्ड, असं काही केलं की सगळे पाहातच राहिले!
या शेतीमधून कसं उत्पन्न मिळतं?
केशर शेतीसाठी 4 महिन्यांचा कालावधी असतो. त्यामध्ये ही फुलं येतात. 250 किलो बी आणले होते त्यातील 50 किलो हे छोटे निघाले. आता 200 किलोंची लागवड केली आहे. यामधून 500 ग्रॅम चे केसर भेटणार आहे. याचे रेट 400 रुपये पासून ते 800 रुपयेपर्यत आहे. त्यामुळेच या शेती मधून चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. ही शेती करताना कुठल्याही केमिकलचा वापर केला जात नाही. तशी ही शेती करण्यास देखील सोपी आहे, असे राठोड सांगतात.
परिस्थिती कुठली ही असो त्यामध्ये खचून न जाता त्यातून मार्ग काढला पाहिजे. आजारातून बाहेर पडत आणि केशर शेती यशस्वी करून असाच काहीसा संदेश राठोड यांनी दिला आहे.