साडेपाच वर्षाच्या मनस्वीचा वर्ल्ड रेकॅार्ड, असं काही केलं की सगळे पाहातच राहिले!
- Published by:News18 Marathi
Last Updated:
जगातील सर्वात कमी वयाच्या क्रिडापटूचा विक्रम पुण्यातील मनस्वी पिंपरे हिच्या नावे झालाय.
पुणे, 19 ऑक्टोबर: आजपर्यंत अनेकांनी आपल्या नावावर अनोखे वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. सध्या पुण्यातील कोंढावा येथे राहणाऱ्या साडेपाच वर्षांच्या मनस्वी विशाल पिंपरे हिच्या विश्वविक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. मनस्वीने लिंबो स्केटिंग प्रकाराच चक्क मोबाईल एवढ्या उंचीच्या खालून जात अनोखा विक्रम केला आहे. लोवेस्ट लिंबो स्केटिंग ओवर 25 मीटर आणि 16.5 सेंटीमीटरच्या खालून केलेल्या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. पूर्वीचे 11 वर्षाच्या मुलीचे आठ वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मनस्वीने तोडले आहे. सर्वात कमी वयात मनस्वीने केलेल्या विश्वविक्रमामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
आतापर्यंत 75 सुवर्णपदकांची कमाई
माझी मुलगी स्केटर आहे. वयाच्या साडेतीन वर्षांपासून तिने स्केटिंग सुरु केलं. मनस्वी आम्हाला लग्नाच्या 12 वर्षानंतर झाली आणि ती जेव्हा झाली तेव्हा मी ठरवलं होत कि मी तिच्या नावाने ओळखलं जावं. मला ते क्षेत्र माहिती नव्हतं. परंतु अनावधानाने तिला स्केटिंग मध्ये टाकलं. पण तिला योग्य प्लॅटफॉर्म मिळाला आणि तिने त्याच्या मध्ये प्रोग्रेस केली. मनस्वीने आता पर्यंत 60 स्पर्धा मिळून 75 गोल्ड मेडल, 7 सिल्वर आणि 8 ब्रॉन्झ मेडल मिळवली आहेत. तर आतापर्यंत तिचा 112 मान्यवराकडून सन्मान केला गेला आहे, असं मनस्वीचे वडील विशाल पिंपरे सांगतात.
advertisement
ऑलिम्पिकसाठी तयारी
नुकतेच 28 जुलै 2023 रोजी केलेल्या रेकॉर्डची वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. जगातली 'यंगेस्ट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर इन द वर्ल्ड' असा टॅग तिला मिळाला आहे. भविष्यात भारतासाठी तिनं गोल्ड मेडलं आणावं यासाठी आम्ही आतापासून तयारी करत आहोत. एशियन, कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक स्पर्धा तिनं गाजवावी. त्यासाठी तिचा डायट प्लॅन असेल किंवा वर्क आऊट असेल हे पाळलं जातं. मनस्वी देखील त्याच जिद्दीने करून दाखवते, अशी माहिती वडिल विशाल देतात.
advertisement
फायर लिंबो स्केटिंगमध्येही विक्रम
मी दोन रेकॉर्ड केले. एक म्हणजे लिंबो स्केटिंग आणि दुसरं फायर लिंबो स्केटिंग. माझ्या सरांचं नाव विजय आहे. मला मम्मी पप्पा आणि सर शिकवतात. पुढे जाऊन मला एसीपी बनायचं आहे. तसेच स्पर्धा जिंकायच्या आहेत, असं स्केटर मनस्वी पिंपरे सांगते.
advertisement
मनस्वी अनेकांसाठी आदर्श
मनस्वीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवलं आहे. स्केटिंग मध्ये लिंबो स्केटिंग प्रकार येतो. यामध्ये तिनं 16.5 इंच एवढ्या उंचीवरून लिंबो स्केटिंग केलं. तिने आज जगामध्ये तिचं नाव प्रस्थापित केलं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक कडून तिला सर्टिफिकेट देखील मिळालं आहे. आज मुलगी काय करू शकते? असं कुणी विचारलं तर मला वाटतं की मनस्वीकडे बघून याचं उत्तर मिळेल, असं प्रशिक्षक विशाल मलजी सांगतात.
advertisement
कसा केला विक्रम?
मनस्वीने विश्वविक्रमासाठी 3 महिने आधीच सराव सुरू केला होता. डायट, वर्क आऊट काही प्लॅन सुरुवातीला केले. वर्ल्ड गिनीज रेकॉर्डसाठी अप्रूव्हल पाठवलं. त्यांच्याकडून अप्रूव्हल आल्यानंतर 29 जूनला हा रेकॉर्ड प्रस्थापित केला. याचा आम्हाला खरच आनंद होत आहे. तिच्या आई वडिलांना मी धन्यवाद म्हणेन कारण त्यांनी स्पोर्ट्स स्केटिंग मध्ये मनस्वीला आज इथंपर्यंत पोहोचवलं. सर्वात जास्त आनंद होतो की जगातली सर्वात तरुण स्पोर्ट्स गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मनस्वीच्या नावावर आहे, अंसही प्रशिक्षक विशाल म्हणतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 19, 2023 12:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
साडेपाच वर्षाच्या मनस्वीचा वर्ल्ड रेकॅार्ड, असं काही केलं की सगळे पाहातच राहिले!