TRENDING:

Youtube वर पाहिला Video अन् घेतला सफरचंदाच्या शेतीचा निर्णय; दुष्काळी भागातील शेतकरी करतोय आता लाखोंची कमाई

Last Updated:

सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील शेतकरी जालिंदर दडस यांनी एक एकर क्षेत्रामध्ये सफरचंदाची शेती केली आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी 
advertisement

सातारा : सफरचंदाची शेती म्हटलं की आपल्याला बर्फाळ काश्मीरमधील बागा आठवतात. पण सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील शेतकरी जालिंदर दडस यांनी एक एकर क्षेत्रामध्ये सफरचंदाची शेती केली आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.

कशी साधली किमया? 

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या टाकेवाडी हे जालिंदर दडस यांचे गाव आहे. जालिंदर दडस यांनी युट्युबवर माहिती घेऊन काश्मीर, राजस्थान आणि बाहेरील देशातून म्हणजे हॉलंड आणि इटलीमधून चार जातींची रोपे सुरुवातीला मागवली. एका एकरामध्ये चार जातींच्या 500 हून अधिक झाडांची लागवड त्यांनी केली. त्यांच्या एका झाडाला दीडशे किलो माल तयार तयार होत आहे. त्यामुळे या सफरचंदाच्या लागवडीतून महिन्याला 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पादन त्यांना होत आहे. तर वार्षिक 6 ते साडेसात लाख रुपयांचे उत्पादन होत असल्याचे जालिंदर दडस यांनी सांगितले.

advertisement

तिखट मिरचीने केली कमाल, शेतकरी झाला मालामाल; सव्वा एकरात 8 लाखांची कमाई, Video

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

सफरचंदाच्या पिकाला सेंद्रिय पद्धतीने शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर केला तर फळाला चांगली गोडी येते. वेळच्या वेळी स्प्रेची फावरणी करणे गरजेचे असते. दुष्काळी भागातील शेतकरी हे कायम डाळिंब शेती वर भर देतात. मात्र या दुष्काळी भागात एक एकरमध्ये सफरचंदाची लागवड केल्याने पुढील काळात युवा वर्ग देखील सफरचंदाची शेती कडे वळू शकतो. मी युट्युबवर सफरचंदच्या शेतीची लागवड दुष्काळी भागात करता हे पहिले आणि त्यानंतर मला माहिती मिळाली. यानंतर मी सफरचंदाची शेती करण्याचा निर्णय घेतला, असंही जालिंदर दडस यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
Youtube वर पाहिला Video अन् घेतला सफरचंदाच्या शेतीचा निर्णय; दुष्काळी भागातील शेतकरी करतोय आता लाखोंची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल