बीडमध्ये सीताफळ लागवडीचं क्षेत्र अधिक
राज्यातील सोलापूर, हिंगोली, परभणी आणि त्यानंतर सर्वाधिक सीताफळ लागवडीचे क्षेत्र हे बीड जिल्ह्यातील धारूर आणि वडवणी तालुक्यात आहे. या गावातीलच सीताफळाला दरवर्षी दिवाळीत पर राज्यातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. त्यामुळे सीताफळ उत्पादकांना वर्षातून एकदाच थोडा का होईना फायदा होतो. मात्र यंदा ऐन उन्हाळ्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं सीताफळाचं पीक आता धोक्यात आलंय.
advertisement
पावसानं दडी मारल्यानं पिकांनी टाकल्या माना, हतबल बळीराजची कळकळीची मागणी
सीताफळाचं पीक धोक्यात
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सीताफळाच्या फळधारणेमध्ये कमतरता दिसून येतेय. या मागची प्रमुख कारणे म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. याचा परिणाम थेट सीताफळाच्या झाडामधील जो अन्नसाठा तयार झालेला होता, तो पूर्णपणे झाडाच्या माध्यमातून बाहेर फेकला गेला. याचा अर्थ फळबागा लिकेज झाल्या, असे कृषी अभ्यासक शाहीर सांगतात.
नेमकं झालंय काय?
राज्यात काही अपवाद परिसर सोडला तर सर्वच ठिकाणी सीताफळाचा मृग बहर धरतात. मृग बहरातील सीताफळे ऑक्टोबर मध्ये तोडणी सुरू होते. डिसेंबर जानेवारीपर्यंत तोडणी झाल्यानंतर बागेचे पाणी सोडून खत घालून छाटणी केली जाते. त्यानंतर थेट मे किंवा जून महिन्यात पाणी सोडले जाते. यंदा मात्र मार्च महिन्यात जोरदार व सतत पाऊस पडल्याने झाडाला पाणी मिळाले. त्यामुळे तेव्हाच भर आला आणि त्याच झाडांची ताकद वाया गेल्याने जूनमध्ये धरलेला मृग बहर फळे कमी लागत आहेत, असे शाहीर यांनी सांगितलं.
Video: लगेच करा हे उपाय अन्यथा एक माशी करेल आख्खी फळबाग उद्ध्वस्त
फळधारणा 50 टक्केपर्यंत कमी
ज्या ठिकाणी सिताफळाला योग्य वेळी छाटणी आणि पाण्याचा नियोजन झाले आहे. त्या बागेमध्ये फळधारणा चांगली दिसून येते. मात्र बीड जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील सीताफळांच्या बागांत जवळपास 50 ते 60 टक्के पर्यंत फळधारणा कमी झाल्याचे दिसून येते. त्याचा मोठा फटका आता सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.





