रायबरेली : भारत देशातील मोठ्या प्रमाणात लोक हे शेतीसोबत पशुपालन करुन आपले उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये एक महत्त्वाचे म्हणजे शेळीपालन आहे. कारण शेळीपालन एक असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये खर्च कमी आणि चांगला नफा होतो. त्यामुळे शेळीपालन करणारे शेतकऱ्यांनी प्राणी तज्ज्ञांचा हा सल्ला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
रायबरेली येथील राजकीय प्राणी रुग्णालय शिवगढचे प्रभारी अधिकारी डॉ. इंद्रजीत वर्मा (MVSC पशुवैद्यकीय) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितेले की, शेळीपालन करणारे शेतकरी सुधारित जातीच्या शेळी बीटलचे संगोपन करून चांगला नफा मिळवू शकतात. कारण, बीटल जातीची शेळी ही प्रगत जातीची शेळी मानली जाते. या जातीच्या शेळ्यांची दूध उत्पादन क्षमता जास्त असते, असे ते म्हणाले.
advertisement
कल्पनाही करू शकत नाही, इतके श्रीमंत होणार! 2025 पर्यंत या तीन राशीच्या लोकांवर राहुची कृपा
या शेळीची प्रमुख विशेषतः अशी असते की, हे डेअरी सह मांसाहारासाठी चांगली असते. या शेळीच्या चामड्यापासून बनलेल्या वस्तूंना बाजारात मोठी मागणी आहे. या शेळीचे चामडे उच्च गुणवत्ता असलेले आहे. ही शेळी भारतातील पंजाब आणि हरयाणा राज्यात आढळते. पंजाबच्या अमृतसर, गुरदासपुर आणि फिरोजपुर या जिल्ह्यात आढळते. यामुळे अमृतसरी बकरी या नावाने ही शेळी ओळखली जाते.
कशी करावी ओळख -
बीटल जातीची शेळी इतर शेळ्यांपेक्षा खूप वेगळी असते. तिच्या लांब पायांसह, तिचे कानही लांब आणि लटकलेले आहेत. तिची शेपटी लहान आणि पातळ असते. तिची शिंगे पाठीमागे वळलेली असतात. तसेच या जातीच्या प्रौढ शेळीचे वजन 50 ते 60 किलो असते आणि शरीराची लांबी 86 सेमी असते, अशी माहिती त्यांनी दिली.
अयोध्येतून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मोठी भविष्यवाणी; राम मंदिराचे मुख्य पुजारी काय म्हणाले?
ते पुढे म्हणाले की, ही शेळी प्रत्येक दिवसी 2 ते 3 लीटर दूध देते. स्तनपान करवताना ती 1.5 ते 1.9 लिटर दूध तयार करते. सामान्य जनावरांप्रमाणे ही शेळी चार खाणे पसंत करते. तिच्या किंमतीचा विचार केला असता, 20 ते 25 हजार रुपयांना ही शेळी विकली जाते.