गया : ग्रामीण भागातील तरुणांचा शेतीपूरक व्यवसायांकडे कल वाढला आहे. कमी क्षेत्रात, कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी उत्पादनं तरुण शेतकरी घेऊ लागले आहेत. असाच एक व्यवसाय आहे वर्तकपालन.
बिहार राज्यातील शेतकरी वर्तकपालनातून 30 ते 40 दिवसांमध्ये लाखोंचा नफा कमवतात. शिवाय कोंबडी पाळण्यापेक्षा हे पालन कमी खर्चिक आहे. वर्तकाच्या तुलनेत कोंबड्या सांभाळण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. तर, वर्तक पक्षी आकाराने लहान आणि कमी वजनाचे असल्यामुळे त्यांना सांभाळणं सोयीस्कर असतं. वर्तक पक्षी म्हणजे करड्या रंगाची चिमणी. या पक्षाचं मांस चवीला कोंबडीपेक्षा स्वादिष्ट लागतं, असं लोक म्हणतात. त्यामुळे त्याला बाजारात प्रचंड मागणी मिळते. शिवाय वर्तकची अंडी आरोग्यासाठी पौष्टिक असतात. हीच बाब लक्षात घेऊन शेतकरी वर्तकाचा वापर उत्पन्नासाठी करू लागले आहेत, ज्यातून त्यांना चांगला नफा मिळतोय.
advertisement
तिखट मिरचीने केली कमाल, शेतकरी झाला मालामाल; सव्वा एकरात 8 लाखांची कमाई, Video
वर्तक पक्षाला परिपक्व होण्यासाठी 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर मादा वर्तक अंडी देण्यास सुरूवात करते. या अंड्यांमध्ये लोह आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर ते चवीलाही स्वादिष्ट असल्याने लोक आवडीने खातात.
बिहारच्या गया भागातील तरुणांनी या पक्षीपालनातून चांगला नफा मिळवलाय. कुमार गौतम या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास साडेतीन वर्षांपूर्वी त्याने अरवल जिल्ह्यातून वर्तकाचा एक पिल्लू आणला होता. या पिल्लापासून त्याने वर्तकपालन सुरू केलं. त्यावेळी वर्तकाच्या मांसाला मिळणारी किंमत आता कितीतरी पटीने वाढलीये.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा