कशी करतात शेती?
गौतम राठोड यांनी केशर लागवडीचे प्रशिक्षण घेतलेले आहे. गौतम राठोड यांनी छतावरील एका बंदिस्त प्लॉटमध्ये केशरची लागवड केली आहे. त्यांनी त्यांच्या इमारतीच्या छतावर व्हर्टीकल फार्मिंगद्वारे सुमारे दीड एकर जमिनीच्या समतुल्य केशर लागवडीसाठी वातावरण तयार केले आहे.
घोड्याचा भाव ऐकून बसेल धक्का; किंमतीत येतील 7 मर्सिडीज-बेंझ, Video
advertisement
केशरच्या शेतीला व्हर्टिकल फार्मिंग म्हणतात. ही एरोपोनिक्स पद्धतीने केली जाते. लागवड साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाते नंतर पुढील तीन महिने हे फ्लावरिंगचे असतात. प्रत्येक कंद हा तीन फुले देतो. त्याच लाईफ हे 8 ते 9 वर्ष इतकं आहे. वातावरण हे पूर्णपणे काश्मीर सारखं करावं लागत. त्यामुळे पूर्ण ट्रेनिंग घेऊनच याची शेती करावी, असं गौतम राठोड सांगतात.
तस्कर सापाशिवाय जन्मली पिले, पुण्यातील सर्पमित्रानं कशी केली किमया? Video
केशर हे तोळ्यावर विकले जाते. केशरचे महत्त्व भारतीय अन्न पदार्थात मोलाचे स्थान आहे. प्रतिग्रॅम 300 ते 1500 रुपयांपर्यंत याची विक्री केली जाते. त्याच्या दर्जानुसार केशरचा भाव आपल्याला बाजारात पाहायला मिळतो. काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी थंड आणि बर्फाळ प्रदेशात केशरचे उत्पादन केले जाते. त्यामुळे केवळ मागणीच्या फक्त 3 ते 4 टक्केच उत्पादन भारतात घेतले जाते, असं गौतम राठोड सांगतात.
पेन्शनच्या पैशातून वृक्षसंवर्धनाचा वसा, ओसाड माळावर फुलवली फळबाग, Video
एरोपोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे काय?
गेल्या काही वर्षांमध्ये शेतीसाठी एरोपोनिक्स तंत्रज्ञान विकसित झालं आहे. यामध्ये बंद खोलीत तापमानाला नियंत्रण करून शेती केली जाते. यामध्ये माती किंवा पाण्याचा उपयोग केला जात नाही. कमी वेळेत अगदी लाखोंचं उत्पादन मिळवून देणाऱ्या या नव्या आणि वेगळ्या प्रयोगाला एरोपोनिक्स तंत्रज्ञान असं म्हणतात. ही शेती करताना योग्य प्रकारे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे कारण यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. यामधून योग्य पद्धतीनं उत्पन्न मिळवता येते, असंही गौतम राठोड सांगतात.