नाशिक : नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड केली जाते. सध्याचा काळ हा द्राक्षवेलीचा कलम करण्याचा कालावधी आहे. नव्याने द्राक्ष लागवड करावयाची असल्यास दोन पद्धतीने केली जाते. पहिली पद्धत म्हणजे जमिनीत खुंटांची लागवड करुन आणि नंतर त्यावर आवश्यक त्या जातींचे कलम करणे आणि दुसरी पद्धत म्हणजे, तयार असलेल्या कलम रोपांची लागवड करणे.
advertisement
आता सध्या सर्वत्र कलम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे द्राक्ष कलम करताना कुठली काळजी घ्यावी याबाबत कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कलम करताना बागेतील तापमान हे 30 ते 35 अंश सेल्सिअस आणि 80 ते 90 टक्के असे वातावरण गरजेचे आहे. यासोबत खुंटकाडी ही रसरशीत असणे व पाचर कलम करतेवेळी कलमजोड हा प्लास्टिक पट्टीने योग्य जोडून आणि त्याला बांधून घेणे गरजेचे असते. बऱ्याच ठिकाणी कलम करण्याच्या कालावधीत पावसाला खंड पडलेला असतो. अशास्थितीत सायन काडीमध्ये रसनिर्मिती कमी होत असते.
अशा परिस्थितीतील असलेल्या बागेत कलम करण्याच्या आधी 3 ते 4 दिवस त्यांना भरपूर पाणी द्यावे. त्याचा फायदा काडीमध्ये रसनिर्मितीला मोठ्या प्रमाणात होत असतो. कलम केल्यानंतर बागेत ऊन जास्त असल्यास सायन काडीच्या शेंड्यावर मेण लावून घ्यावे. कलम केल्यानंतर साधारणतः 15 ते 16 दिवसात सायन काडीवर डोळे फुटण्यास सुरुवात होते.
मुंबईत मिळणार हक्काचे घर, म्हाडाने अर्ज करण्याची मुदत वाढवली, आता ही आहे शेवटची तारीख
त्यापूर्वी खुंटकाडीवरील सकर्स भरपूर प्रमाणात दिसून येतील. नंतर वेळीच सकर्स काढून घ्यावेत. अन्यथा डोळे फुटणार नाहीत. डोळे लवकर फुटण्यासाठी बागायतदार सायड्रोजन सायनामाईडचे पेस्टींग करतात. यामुळे काडी लवकर फुटून काही दिवसातच ती फूटजुडण्यास सुरुवात होते.
महिलांसाठी चांगली संधी, छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वस्तात मिळतायेत पारंपारिक मोत्याची दागिने, VIDEO
परिणामी, कलम यशस्वी होणार नाही. त्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा वापर या बागेत टाळावा. त्यापेक्षा डोळा फुटलेल्या अवस्थेत जमिनीतून नेत्राचा वापर फायद्याचा ठरत असतो. अशा पद्धतीने द्राक्षांची बाग आपण उत्तम पद्धतीने लागवड करू शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्हालाही द्राक्ष कलम करायचे असेल तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकते.