महिलांसाठी चांगली संधी, छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वस्तात मिळतायेत पारंपारिक मोत्याची दागिने, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरात तुम्ही दागिने अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी या ठिकाणी पारंपारिक अस्सल असे मोत्याचे दागिने उपलब्ध आहेत. तुम्हाला याठिकाणी भरपूर असा डिस्काउंटही मिळेल.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलाही सण, महिलांना श्रृंगार करायला आवडते. यामध्ये महिलांच्या सौंदर्यामध्ये छान दागिन्यांनी आणखीनच भर पडते. आता लवकरच गौराईचे आगमन होणार आहे आणि इतरही सण आता एका पाठोपाठ येणार आहेत. त्यामुळे यासाठी तुम्हालाही सुंदर आणि छान असे पारंपारिक मोत्याचे दागिने खरेदी करायचे असतील, ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरात तुम्ही दागिने अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी या ठिकाणी पारंपारिक अस्सल असे मोत्याचे दागिने उपलब्ध आहेत. तुम्हाला याठिकाणी भरपूर असा डिस्काउंटही मिळेल.
याठिकाणी दागिन्यांचे प्रकार कोणते -
बुगडी, चिंचपेठ, 11 पेटी चिंचपेठ, बांगड्या, तोडे, पैंजण, वेणी, मोत्याचे कानातले, मोत्यांच्या बांगड्या, झुमके, टॉप्स, तन्मणी, मोत्यांचे हार, चोकर, मंगळसूत्र, नथनी, कंबरपट्टा, ब्रासलेट, बाजूबंद असे वेगवेगळे दागिने याठिकाणी उपलब्ध आहेत. येथील बुगडीची किंमत ही 125 ते 500 या दरम्यान आहे. तर चिंचपेटी 3 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येते. झुमक्याचा दर 150 रुपयांपासून सुरू होऊन 400 ते 500 रुपयांपर्यंत आहे. 4 बांगड्या, मोत्याचं मंगळसूत्र, मोत्याची बुगडी, आणि मोत्याचा बाजूबंद असा सेटही याठिकाणी उपलब्ध असून त्याची किंमत 795 रुपये इतकी आहे.
advertisement
त्यामुळे तुम्हालाही असे चांगले मोत्याचे स्वस्तातले दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी या ठिकाणी जाऊन हे सर्व दागिने खरेदी करू शकता.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
September 03, 2024 3:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
महिलांसाठी चांगली संधी, छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वस्तात मिळतायेत पारंपारिक मोत्याची दागिने, VIDEO