TRENDING:

उद्यापासून कामावर येऊ नका, 16 हजार कर्मचाऱ्यांना हकालपट्टीचा मेल पाठवणाऱ्या HRची नोकरी देखील जाणार; भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा फटका

Last Updated:

Massive Layoff: अ‍ॅमेझॉनकडून उद्या 27 जानेवारी रोजी तब्बल 16 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होण्याची दाट शक्यता असून, यात भारतीय टेक हब्समधील कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

advertisement
नवी दिल्ली: अ‍ॅमेझॉन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत. एका अहवालांनुसार 27 जानेवारी रोजी अ‍ॅमेझॉनकडून नव्या फेरीतील कर्मचारी कपात जाहीर होण्याची शक्यता असून यात जगभरातील सुमारे 16 हजार कर्मचाऱ्यांवर गंडांतर येऊ शकते. ही कारवाई कंपनीच्या व्यापक पुनर्रचनेचा (restructuring) भाग असून, 2026 च्या मध्यापर्यंत एकूण जवळपास 30 हजार कॉर्पोरेट नोकऱ्या कमी केल्या जाऊ शकतात.
News18
News18
advertisement

विशेष म्हणजे यावेळी ही नोकरकपात भौगोलिकदृष्ट्या अधिक व्यापक असण्याची शक्यता आहे. आधीच्या तुलनेत भारतामधील टीम्सवर अधिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतातील कर्मचाऱ्यांना मोठा फटका?

Blind आणि Reddit यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चर्चांनुसार आणि विविध माध्यमांच्या वृत्तांनुसार येत्या काही दिवसांत अ‍ॅमेझॉनकडून अधिकृत घोषणा होऊ शकते. या छाटणीचा फटका Amazon Web Services (AWS) आणि Prime Video यांसारख्या महत्त्वाच्या विभागांनाही बसू शकतो.

advertisement

अ‍ॅमेझॉनची ही पुनर्रचना प्रक्रिया 2025 च्या अखेरीस सुरू झाली होती. ऑक्टोबर 2025 मध्ये कंपनीने पहिल्या टप्प्यात सुमारे 14 हजार व्हाइट-कॉलर (कॉर्पोरेट) नोकऱ्या कमी केल्या होत्या.

अ‍ॅमेझॉन 30 हजार नोकऱ्या कमी करणार?

Reuters च्या एका अहवालानुसार 2025 अखेरपर्यंत अ‍ॅमेझॉनने सुमारे 30 हजार कॉर्पोरेट पदे कमी करण्याचा आराखडा आखला होता. त्यानंतर कंपनीने 14 हजार नोकऱ्या कमी केल्याची अधिकृत पुष्टी केली. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता असून, त्यामुळे एकूण नोकरकपात जवळपास 30 हजारांवर पोहोचू शकते. असे झाल्यास ही कपात 2022 आणि 2023 मध्ये झालेल्या 27 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरकपातीपेक्षाही मोठी ठरेल. सध्या अ‍ॅमेझॉनकडे जगभरात सुमारे 15.7 लाख कर्मचारी आहेत. मात्र या कपातीचा मुख्य फटका सुमारे 3.5 लाखांच्या कॉर्पोरेट वर्कफोर्सला बसणार आहे.

advertisement

कोणते विभाग प्रभावित होणार?

या आगामी कपातीचा परिणाम अ‍ॅमेझॉनच्या अनेक महत्त्वाच्या विभागांवर होण्याची शक्यता आहे. यामध्ये AWS (Amazon Web Services),Prime Video, Retail Operations, People Experience and Technology (PXT) म्हणजेच अ‍ॅमेझॉनचा अंतर्गत HR विभाग यांचा समावेश आहे. विशेषतः बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई येथील भारतीय कॉर्पोरेट टीम्स यावेळी अधिक असुरक्षित मानल्या जात आहेत.

advertisement

नोकरकपात नेमकी कधी सुरू होणार?

Reddit, Blind आणि LinkedIn वरील अ‍ॅमेझॉन कर्मचाऱ्यांच्या पोस्टनुसार 27 जानेवारीच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच नोकरकपात प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. Blind वरील अनेक कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, काही मॅनेजर्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधीच कपातीचे संकेत दिले आहेत.

काही अहवालांनुसार, Performance Improvement Plan (PIP) वर असलेल्या कर्मचाऱ्यांना आधी सूचना दिली जाऊ शकते. तसेच, आधीच 1,000 ते 2,000 कर्मचाऱ्यांना WARN नोटिसा पाठवण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्यापूर्वी अशा नोटिसा देणे बंधनकारक आहे. मात्र अ‍ॅमेझॉनने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

advertisement

नोकरकपातीमागचे कारण काय?

अ‍ॅमेझॉनचे CEO अँडी जॅसी यांचे म्हणणे आहे की, ही नोकरकपात तात्काळ खर्च वाचवण्यासाठी नाही, तसेच ती पूर्णपणे AI मुळेही नाही. त्यांच्या मते, ही प्रक्रिया कंपनीच्या संरचनात्मक बदलांसाठी आहे.

जॅसी यांनी वारंवार सांगितले आहे की, गेल्या काही वर्षांत अ‍ॅमेझॉनचा अतिवेगाने विस्तार झाल्यामुळे व्यवस्थापनाचे अनेक स्तर निर्माण झाले. ज्यामुळे निर्णय प्रक्रिया मंदावली आणि नवकल्पनांवर परिणाम झाला. ही अनावश्यक नोकरशाही कमी करणे हा या छाटणीचा मुख्य उद्देश आहे.

AI चा अप्रत्यक्ष प्रभाव

जरी अ‍ॅमेझॉन थेट AI मुळे नोकरकपात होत असल्याचे नाकारत असले, तरी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही कंपनीच्या पुनर्रचना धोरणातील महत्त्वाची बाब आहे. HR, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कस्टमर सपोर्टसारख्या क्षेत्रांत अ‍ॅमेझॉन मोठ्या प्रमाणावर ऑटोमेशन करत आहे.

यामुळे, उत्पादन किंवा सेवा थेट तयार न करणाऱ्या मधल्या व्यवस्थापनातील आणि प्रशासकीय भूमिकांमध्ये कपात केली जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अ‍ॅमेझॉनची ही दुसरी मोठी नोकरकपात फेरी ठरणार असून, विशेषतः भारतातील टेक कर्मचाऱ्यांसाठी येणारे दिवस अनिश्चिततेचे असणार आहेत.

मराठी बातम्या/मनी/
उद्यापासून कामावर येऊ नका, 16 हजार कर्मचाऱ्यांना हकालपट्टीचा मेल पाठवणाऱ्या HRची नोकरी देखील जाणार; भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा फटका
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल