TRENDING:

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेबद्दल मोठी बातमी, अंगनवाडी सेविकांवर मोठी जबाबदारी, कागदं तयार ठेवा!

Last Updated:

निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली ही योजना आता e-KYC च्या वादात अडकली आहे. लाभार्थी आणि गरजवंत महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ

advertisement
मुंबई : महायुती सरकारी महत्त्वाकांक्षी असलेल्या लाडकी बहिण योजनेचा हफ्ता कधी मिळणार, याकडे सगळ्या लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. पण, महापालिका निवडणुका संपल्या तरीही जानेवारीचा हफ्ता काही आला नाही. राज्यातील काही भागांमध्ये महिलांनी आंदोलनं सुद्धा केली. पण, आता राज्य सरकारने e-KYC मध्ये चुका केल्याचा निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे आता राज्यभरात अंगनवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
News18
News18
advertisement

लाडकी बहिण योजनेला आता चांगलीच घरघर लागली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली ही योजना आता e-KYC च्या वादात अडकली आहे. लाभार्थी आणि गरजवंत महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी e-KYC प्रक्रिया सुरू केली आहे. दिवाळीपासून e-KYC प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबर ३१ पर्यंत मुदत दिली होती. पण, यामध्ये त्रुटी काढून आता राज्य सरकारने अंगनवाडी सेविकांचं पाचरण केलं आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून याबद्दल तशी माहिती दिली.

advertisement

" महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.

तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत" असं तटकरे यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

advertisement

दरम्यान, आता अंगनवाडी सेविका आता राज्यभरात घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे. याआधीही अंगनवाडी सेविकांवर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय झाला होता. पण, अंंमलबजावणी झाली नाही. आता मात्र, अंगनवाडी सेविका आता लाडक्या बहिणीच्या दारात येणार आहे.

मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेबद्दल मोठी बातमी, अंगनवाडी सेविकांवर मोठी जबाबदारी, कागदं तयार ठेवा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल