छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरामध्ये अशोक धानोरकर आणि त्यांच्या पत्नी वृषाली धानोरकर राहतात. अशोक धानोरकर हे मूळचे बीड जिल्ह्यातील धानोरा या गावचे आहेत. त्यांचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे गावाकडेच झालेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आले आणि या ठिकाणी त्यांनी काही टेक्निकल कोर्स केले आणि त्याच्यानंतर काही दिवस संभाजीनगर शहरामध्ये नोकरी केली. त्यानंतर 2012 साली त्यांचा विवाह हा वृषाली धानोरकर यांच्यासोबत झाला. त्यानंतर ते पुणे येथे नोकरीसाठी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा जॉब व्यवस्थित रित्या चालू होता.
advertisement
पण त्यांच्या पत्नी जेव्हा या गरोदर होत्या तेव्हा त्यांना त्या ठिकाणी खूप अशा अडचणी आल्या. कारण की त्यांची नोकरीची वेळ ही रात्री होती. तेव्हा त्यांची पत्नी आणि आई यांची खूप फजिती झाली कारण की तिथे कोणी त्यांचं जवळचं नातेवाईक नव्हतं. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की आपण ज्या ठिकाणी आपले सर्व नातेवाईक आहेत अशा ठिकाणी जाऊन नोकरी करावी. ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थायिक झाले.
अशोक धानोरकर यांनी या ठिकाणी आल्यानंतर काही दिवस नोकरी केली पण त्या ठिकाणी त्यांना पाहिजे तसा पगार मिळत नव्हता आणि काम पण खूप होते. त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी सुरुवातीला स्वतःचे आईस्क्रीम पार्लर टाकले. पण त्याला पण पाहिजे तसा प्रतिसाद नाही मिळाला. म्हणून त्यांच्या पत्नी वृषाली यांनी त्यांना सांगितले की आपण पाणीपुरीचा व्यवसाय करूयात. त्यामध्ये खूप असा नफा देखील आपल्याला मिळेल. पण सुरुवातीला अशोक यांनी त्यांच्या निर्णयाला नकार दिला पण नंतर त्यांनी ठरवलं की आपण पाणीपुरीचा व्यवसाय करूयात. त्यांनी त्यांच्या आईस्क्रीम पार्लर समोर पाणीपुरीची गाडी लावली. सध्याला त्यांच्या पाणीपुरीच्या व्यवसायाला चांगली मागणी आहे. त्यासोबतच ते इतर विविध चाट देखील विक्री करतात. आणि त्यांच्या या चाटला देखील संभाजीनगर शहरात खूप मागणी आहे. सध्याला याच्या माध्यमातून ते महिन्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये एवढं उत्पन्न कमवत आहेत. त्यांनी इतरांना देखील यामधून रोजगार निर्माण करून दिला आहे.