रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याच्या सुरुवातीपूर्वी बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. प्रत्येक राज्यात 13 दिवस बँक बंद राहील असं नाही, मात्र प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळ्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे तुम्ही ही संपूर्ण यादी पाहूनच कामाचं नियोजन करा. कोणत्या राज्यात किंवा शहरात बँका कोणत्या कारणास्तव बंद राहणार ते जाणून घेऊया. जुलै महिन्यात दुसऱ्या-चौथ्या शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टीव्यतिरिक्त बँका कधी बंद राहतील?
advertisement
बँक बंद असताना तुम्ही ऑनलाइन काम करू शकाल. डिजिटल पेमेंट किंवा बँक बॅलन्स तपासण्यासारखे काम बँक सुट्ट्यांमध्ये देखील करता येईल. यावेळी बँका जुलैमध्ये एकूण १३ दिवस बंद राहतील. याशिवाय ATM मधून पैसे देखील तुम्ही काढू शकता. तुमची छोटी कामं ऑनलाइन बँकिंगद्वारे करता येईल. ऑनलाईन सेवा 24 तास चालू असणार आहे. शिवाय फोन पे गुगल पेवरुन तुम्ही छोटे पेमेंट करू शकता.
Fixed Deposit: गॅरेंटी आणि सुरक्षित रिटर्न हवेत? या ५ सरकारी बँका देतायत सर्वाधिक व्याज!
३ जुलै २०२५- आगरतळामध्ये बँका बंद राहतील.
५ जुलै २०२५- गुरु हरगोबिंद यांच्या जयंतीनिमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
६ जुलै २०२५- रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद राहातील
१२ जुलै २०२५- महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील.
१३ जुलै २०२५- रविवार असल्याने या दिवशी सर्व बँका बंद राहतील.
१४ जुलै २०२५- बेहदेनखलाममुळे शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
१६ जुलै २०२५- हरेला सणामुळे देहरादूनमध्ये बँका बंद राहतील.
१७ जुलै २०२५- यु तिरोट सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
१९ जुलै २०२५- केर पूजानिमित्त आगरतळामध्ये बँका बंद राहतील.
२० जुलै २०२५- देशातील सर्व बँका रविवारी बंद राहतील.
२६ जुलै २०२५- महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि यानिमित्त देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
२७ जुलै २०२५- रविवार असल्याने देशातील सर्व बँका बंद राहतील.
२८ जुलै २०२५- द्रुकपा त्शे-जीच्या निमित्ताने गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.
महाराष्ट्रात मात्र दुसरा आणि चौथा शनिवार आणि चारही रविवार असे 6 दिवस बँक बंद राहणार आहे. या व्यतिरिक्त जुलै महिन्यात बँका बंद राहणार नाहीत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त तुमच्या कामाचं प्लॅनिंग करू शकणार आहात.