Fixed Deposit: गॅरेंटी आणि सुरक्षित रिटर्न हवेत? या ५ सरकारी बँका देतायत सर्वाधिक व्याज!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बँक ऑफ महाराष्ट्र 366 दिवसांच्या एफडीवर 7.15% व्याज देत आहे. इंडियन ओव्हरसीज बँक 444 दिवसांसाठी 7.10%, तर पंजाब अॅन्ड सिंध बँक 7.05% व्याज देते. FD सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.
आजच्या अस्थिर गुंतवणुकीच्या काळात अनेकजण थोडं कमी मिळाला तरी चालेल, पण पैशात गॅरंटी हवी असं म्हणतात. बाजार कधी वर तर कधी थेट घसरतो. पण फिक्स्ड डिपॉजिट (FD) ही एक अशी गुंतवणूक आहे, जिथं ना तोट्याची भीती नाही, त्यामुळे जेवढे पैसे गुंतवले तेवढे तर नक्की मिळणार, रिटर्न चांगले मिळतील हे दुय्यम भाग झाला. पण पैसे बुडणार नाहीत हे निश्चित असतं.
advertisement
खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँका अगदी 7.15% पर्यंत व्याज देत आहेत, जे एफडीसारख्या सुरक्षित पर्यायात एकदम आकर्षक मानलं जातं. म्हणजेच, निवृत्त नागरिक, गृहिणी, मध्यमवर्गीय कुटुंबं जिथं गुंतवणुकीसोबत सुरक्षित रिटर्नची हमी असते अशा ठिकाणी गुंतवणं सुरक्षित समजतात त्यामुळे त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement