RBI प्रत्येक महिन्याच्या बँकांच्या सुट्ट्या जाहीर करत असते. काही सुट्ट्या देशभरात असतात तर काही सुट्ट्या त्या त्या राज्यातील सणवारांनुसार असतात. सप्टेंबरमध्ये बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. सणांव्यतिरिक्त, त्यात आठवड्याच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. म्हणजेच, सणांमुळे बँका 9 दिवस बंद राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यात ओणम, नवरात्र आणि ईदचा सण आहे, त्यामुळे बँकांना अधिक सुट्ट्या मिळाल्या आहेत.
advertisement
ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही कारण नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सारख्या डिजिटल सेवा सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील. या दिवसांत फक्त चेक क्लिअरिंग आणि बँकेच्या प्रत्यक्ष कामकाजाशी संबंधित इतर कामांवर प्रक्रिया केली जाणार नाही.
3 सप्टेंबर: रांचीमध्ये बँक बंद
4 सप्टेंबर: फर्स्ट ओणम कोच्ची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँक बंद
5 सप्टेंबर: ईद-ए-मिलाद, मिलाद-उन-नबी, तिरुवोनम, गणेश चतुर्थी, इंद्रजात्रा या निमित्ताने अहमदाबाद, मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नईसह अनेक शहरांमध्ये बँकां बंद राहणार आहेत.
6 सप्टेंबर: इंद्रजात्रा, गंगटोक, जम्मू, रायपुर आणि श्रीनगर इथे बँक बंद राहणार
12 सप्टेंबर: ईद-ए-मिलादच्या दुसऱ्या दिवशी जयपुर, जम्मू आणि श्रीनगरमध्ये असणार बँकेला सुट्टी
22 सप्टेंबर: नवरात्र जयपूरमध्ये बँक बंद
23 सप्टेंबर : महाराजा हरि सिंह जयपूरमध्ये बँक बंद
29 सप्टेंबर : महा सप्तमी, दुर्गा पूजा- अगरतला, गुवाहाटी, जयपुर आणि कोलकाता इथे बँक बंद
30 सप्टेंबर : महा अष्टमी/दुर्गा अष्टमी/दुर्गा पूजा-अगरतला, रांची, कोलकाता, पटना, भुवनेश्वर आणि काही शहरांमध्ये बँक बंद राहणार
या तारखांना देशभरात बँका राहणार बंद
7 सप्टेंबर (रविवार)
13 सप्टेंबर (दूसरा शनिवार)
14 सप्टेंबर (रविवार)
21 सप्टेंबर (रविवार)
27 सप्टेंबर (चौथा शनिवार)
28 सप्टेंबर (रविवार)
जर तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या बँकिंग कामासाठी शाखेत जायचे असेल, तर या तारखा नोट करुन ठेवा आणि त्यानुसार नियोजन करा. सुट्टीच्या दिवशीही डिजिटल व्यवहार सुरू राहतील, चेक क्लिअरिंग आणि इतर ऑफलाइन बँकिंग सेवा पुढील कामकाजाच्या दिवशी प्रक्रिया केल्या जातील अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.
