नोकरी करत असतानाच त्यांनी काही पैसे साठवून ठेवली आणि उरलेल्या पैशांसाठी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांकडून देखील व्यवसाय सुरू करण्यास विरोध होता, कारण कुणीही पूर्वी व्यवसाय केलाच नव्हता. तरीही करण राठोड यांनी नोकरी सोडण्याचं धाडस दाखवलं आणि स्वप्न उराशी बाळगत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांना वाटत होतं की, व्यवसायात काही तरी नवीन करून दाखवायचं आहे.
advertisement
व्यवसायाच्या सुरुवातीचे आठ ते नऊ महिने खूप कठीण गेले. अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही आणि नुकसान सहन करावं लागलं. मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांच्यातील चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत यांमुळे त्यांनी परिस्थितीवर मात केली आणि व्यवसायात हळूहळू प्रगती केली. त्यांनी निवडलेला फोटोग्राफी क्षेत्रातला मार्ग थोडा वेगळा होता, पण त्यांनी त्यामध्ये नाव मिळवलं.
आज करण राठोड यांचा फोटोग्राफी व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो आहे. विशेष म्हणजे, जेव्हा अनेक तरुण नोकरीसाठी धडपडत आहेत, तेव्हा करण यांनी इतरांना रोजगार देण्याचं काम केलं आहे. सध्या त्यांच्या स्टुडिओमध्ये 5 ते 6 युवक चांगल्या पगारावर काम करत आहेत. ग्राहकांना दिलेल्या उत्कृष्ट सेवा आणि दर्जेदार कामामुळे ते या व्यवसायाच्या माध्यमातून प्रतिवर्षी कमीत कमी 10 लाखांपर्यंत नफा मिळवतात.
वडवणीसारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या करण राठोड यांची ही यशोगाथा नवोदित तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. जिथे परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि कुटुंबाचा विरोध या सर्व गोष्टी आड येत असतात, तिथे त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला. त्यांचं यश हे स्पष्ट दाखवतं की इच्छाशक्ती आणि कष्टांची तयारी असेल तर कोणतंही स्वप्न सत्यात उतरवता येतं.