शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी प्रत्येकी 10 कोटी रुपये गुंतवले होते. तर आशीष कचोलिया यांनी तब्बल 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र आठ महिने उलटूनही या तिघांनाही आपल्या गुंतवणुकीवर कोणताही परतावा मिळालेला नाही.
IPO चे तपशील
श्री लोटस डेव्हलपर्स अँड रिअल्टी IPO चा प्राइस बँड 140 ते 150 रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. हे दर नोव्हेंबर 2024 मधील प्रायव्हेट प्लेसमेंट दराशी जुळणारे आहेत. त्या वेळी कंपनीने 118 गुंतवणूकदारांकडून 150 रुपये प्रति शेअर दराने समभाग विकून 400 कोटी रुपये उभारले होते. शाहरुख आणि अमिताभ यांच्या नावावर कंपनीचे 6.67 लाख शेअर्स आहेत.
advertisement
आणखी कोणकोणते सेलिब्रिटी गुंतवणूकदार?
ऋतिक रोशन
राकेश रोशन
टायगर श्रॉफ
जीतेन्द्र
तुषार कपूर
साजिद नाडियाडवाला
मनोज बाजपेयी
या सर्वांनी 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आहे. मात्र त्यांच्याही गुंतवणुकीला अद्याप कोणताही परतावा मिळालेला नाही.
कंपनीचा फोकस
लोटस डेव्हलपर्सने जून 2025 पर्यंत एकूण 9.3 लाख स्क्वेअर फूट बांधकाम पूर्ण केलं आहे. कंपनीचा मुख्य भर लक्झरी आणि अल्ट्रा-लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर आहे. या प्रोजेक्ट्सची किंमत 3 कोटी ते 7 कोटी रुपयांपर्यंत असून, काही पेंटहाउस त्याहूनही महाग आहेत.
IPO मधून निधी उभारणी आणि वापर
कंपनी IPO द्वारे 792 कोटी रुपये उभारणार आहे. यातील 550 कोटी रुपये कंपनीच्या तीन सहाय्यक कंपन्यांना –
रिचफील रिअल इस्टेट,
ध्यान प्रोजेक्ट्स,
त्रिक्षा रिअल इस्टेट – दिले जातील.
या रकमेचा वापर मुंबईतील प्रीमियम प्रोजेक्ट्स –
‘अमाल्फी’,
‘द आर्केडियन’,
‘वरुण’ – यांच्या विकासासाठी होणार आहे.
IPO च्या पुढील टप्प्यांचे वेळापत्रक
IPO बोलीसाठी उघडण्याची तारीख: 30 जुलै 2025
बोलीसाठी शेवटची तारीख: 1 ऑगस्ट 2025
शेअर वाटपाची अपेक्षित तारीख: 4 ऑगस्ट 2025
शेअर लिस्टिंगची संभाव्य तारीख: 6 ऑगस्ट 2025
या IPO साठी मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडवायझर्स आणि मोनार्क नेटवर्थ कॅपिटल हे मर्चंट बँकर्स म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
