शेअर बाजारात आज दिवसभरात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे १०.८३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएससी मिडकॅप इंडेक्स २.४४ टक्के, स्मॉलकॅप इंडेक्स ३.१७ टक्के घसरणीसह बंद झाला. इतक नाही तर बीएससी सेक्टोरल इंडेक्स देखील मोठी घसरण झाली. युटिलिटी, मेटल, रियल्टी, पॉवर आणि ऑइल तसेच गॅस या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना सर्वाधिक फटका बसला.
advertisement
कोण आहे विनय हिरेमठ? 8400 कोटींना विकली कंपनी, आता म्हणतोय...
बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स १ हजार २५८.१२ म्हणजे १.५९ टक्क्यांनी घसरून ७७ हजार ९६४.९९ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ३८८.७० अंकांनी म्हणजे १.६२ टक्क्यांच्या घसरणीसह २३ हजार ६१६.०५ अंकांवर बंद झाला.
OYO ने घेतला मोठा निर्णय, तुम्हाला रूम मिळणार की नाही ते एकदा वाचाच
मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप घसरले आणि ते ४३९.०३ लाख कोटींवर पोहोचले. शुक्रवारी हेच मार्केट कॅप ४४९.७८ लाख कोटी इतके होते. बाजारातील गुंतवणुकदारांच्या संपत्तीत १०.८३ लाख कोटी रुपयांची घसरण झाली.
सेन्सेक्समधील ३० पैकी फक्त ३ शेअर तेजीतहोते. ज्यात टायटन, एससीएल टेक आणि सन फार्मा यांचा समावेश होता. तर बाजारातील ४ हजार २४४ पैकी ६५७ शेअर तेजीसह बंद झाले आणइ ३ हजार ४७१ शेअर घसरणीसह बंद झाले.