खिशात ८ हजार ४०० तरी कळत नाहीय काय करू? उद्योगपती लोकांना विचारतोय पैसा कुठे खर्च...

Last Updated:

Loom Co-Founder Vinay Hiremath: अमेरिकेतील भारतीय उद्योगपती विनय हिरेमठ चर्चे आला आहे तो त्याने लिहलेल्या ब्लॉगमुळे होय. 8400 कोटींना स्वत:ची कंपनी विकल्यानंतर विनयला काय करू असा प्रश्न पडला आहे.

News18
News18
मुंबई: यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर अनेकांना असुरक्षित वाटते. जगात अशा लोकांची कमी नाही ज्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून स्वत:च्या कल्पना सत्यात आणता येत नाही. पण असा एक उद्योजक आहे. ज्याच्याकडे काही अब्ज रुपये आहेत आणि तरी आयुष्यात काय करावे असा प्रश्न पडला आहे.
अमेरिकेत राहणारा भारतीय वंशाचा उद्योगपती विनय हिरेमठ (Vinay Hiremath) ची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ऑनलाइन फ्री स्क्रीन रेकॉर्डिंग टूल उपलब्ध करून देणाऱ्या लूम (Loom)चा सह-संस्थापक विनयने २०२३ साली स्टार्टअपची विक्री केली होती. यातून विनयला ९७५ मिलियन डॉलर (तब्बल ८ हजार ४०० कोटी रुपये) मिळाले. लूमची खरेदी एटलसियनने केली होती. कंपनी विकल्यानंतर विनय झटक्यात अब्जोपती झाला. पण आता विनयला आयुष्यात काय करावे, असा प्रश्न पडल्याचे म्हटले आहे.
advertisement
व्हायरस आला अन् शेअर बाजार कोसळला, सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले?
माझ्याकडे खुप पैसे आहेत. पण आता त्याचे काय करू हेच कळत नाहीय. आयुष्यात काय करायचे याचा अंदाज येत नाही. काही करायची इच्छा होत नाही. कंपनीची विक्री केल्यानंतर असे वाटू लागले आहे की, पैसे कमवण्याची किंवा स्टेटस मिळवण्याची कोणतीही इच्छा राहिली नाही. मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण आता त्याचे काय करू असा प्रश्न पडला आहे.
advertisement
OYO ने घेतला मोठा निर्णय, तुम्हाला रूम मिळणार की नाही ते एकदा वाचाच
विनय हिरेमठचा जन्म १९९१ साली झाला. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयस येथील शिक्षण २ वर्षात सोडल्यानंतर त्याने स्वत:चे स्टार्टअप सुरू केले. नंतर शहेद खान याच्यासोबत लूमची स्थापना केली. सहसंस्थापक आणि सीटीओ म्हणून मोठा निधी उभारला. त्याच्या नेतृत्वाखाली कंपनीचा युझर पेस ३ कोटीपेक्षा अधिक होता. २०२३ साली लूमची विक्री केली.
advertisement
एलन मस्क सारखे व्हायचे होते, पण...
कंपनीची विक्री केल्यानंतर विनय रेडवुड्स मध्ये गेला आणि काही नवे करण्याचा प्रयत्न केला. पण गुंतवणुकदार आणि रोबोटिक्स एक्सपर्ट्सला फार प्रभावीत करू शकले नाहीत. त्यानंतर हिमालय प्रवासाला गेलेला विनय आजारी होऊन परतला. एका ब्लॉग पोस्टमध्ये तो म्हणतो की, मला एलन मस्क व्हायचे आहे. एलन मस्क आणि विवेक रामस्वामी यांच्याशी संपर्क करून एक नोकरी देखील मिळवली. पण चार आठवड्यात ते काम सोडले.
advertisement
सध्या विनय हवाईला गेला असून तो फिजिक्सचा अभ्यास करतोय. एक कंपनी तयार करण्याची त्याची योजना आहे.
मराठी बातम्या/मनी/
खिशात ८ हजार ४०० तरी कळत नाहीय काय करू? उद्योगपती लोकांना विचारतोय पैसा कुठे खर्च...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement