Stock Market Updates: व्हायरस आला अन् शेअर बाजार कोसळला, सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले?

Last Updated:

Stock Market Crash: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तेजीने सुरू झालेल्या शेअर बाजारात HMPV व्हायरसची नजर लागली आणि सेन्सेक्ससह निफ्टीमधील अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले.

News18
News18
मुंबई: चीनमध्ये नव्याने सापडलेल्या HMPV व्हायरसचा भारतात रुग्ण सापडल्यानंतर शेअर बाजारात मोठा भूकंप झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १ हजार १००हून अधिक अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये जवळ जवळ १.४ टक्क्यांची घसरण झाली.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार तेजीसह खुला झाला होता. मात्र त्यानंतर देशातील पहिला HMPVचा रुग्ण सापडल्याचे वृत्त आल्यानंतर मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजारात खरेदीचा धडाका लावल्याने अनेक कंपन्यांचे शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. इंडिया VIX मध्ये १३ टक्क्यांची वाढ दिसली. तर सेन्सेक्समध्ये १ हाजर २०० टक्क्यांच्या घसरणीसह तो ७७ हजार ९६० वर पोहोचला. तर निफ्टी २३ हजार ६०० अंकांपर्यंत खाली आला होता.
advertisement
OYO ने घेतला मोठा निर्णय, तुम्हाला रूम मिळणार की नाही ते एकदा वाचाच
पीएसयू बँका, रिअल इस्टेट आणि तेल आणि गॅस क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ७% घसरण झाली तर बँक ऑफ बडोदा, एचपीसीएल, बीपीसीएल, टाटा स्टील, अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि पीएनबी ४-५% घसरले. एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) आणि कोटक महिंद्रा बँक हा सेन्सेक्समधील कंपन्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, गुंतवणूकदारांचे लक्ष तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर तसेच डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेतील दुसरी टर्म आणि भू-राजकीय मुद्द्यांवर होते. तेव्हा भारतात HMPVचे पहिले प्रकरण सापडल्याच्या वृत्तानंतर शेअर बाजारात भूकंप झाला.
advertisement
पाणीपुरीवाल्याला आली ४० लाखांची GST नोटीस
बेंगळुरूमधील एका ८ महिन्याच्या मुलाला HMPVची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर बाजारात खळबळ उडाली. या वृत्तानंतर अन्य दोघांना HMPVची लागण झाल्याचे समोर आले. ज्यात ३ महिन्यांच्या लहान मुलाचा समावेश होता. दरम्यान यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अपडेटनुसार हा कोणताही नवा व्हायरस नाही. तर हवामानातील बदलामुळे होणारा आजार आहे. याबाबत काळजी करण्यासारखे काहीच नाही.
मराठी बातम्या/मनी/
Stock Market Updates: व्हायरस आला अन् शेअर बाजार कोसळला, सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement