TRENDING:

शिक्षणासोबत व्यवसाय, दादरमध्ये मराठी मुलगा चालवतोय फूड स्टॉल, मिळतात खास पदार्थ, दिवसाची कमाई...

Last Updated:

thane food start up success story - जीपीएस कॉर्नर असे त्याच्या या फूड स्टॉलचे नाव आहे. याठिकाणी तुम्हाला चिकन पाव, वेफर क्रिस्पी चिकन पाव हे सगळे पदार्थ मिळतात. यांची किंमत फक्त 25 ते 30 रुपये असल्यामुळे दादरकर तरुण मंडळी आवर्जून इथे खायला येतात. दादर स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या आगर बाजार येथे त्याचा हा फूड स्टॉल आहे.

advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
advertisement

मुंबई - नोकरीच्या तुलनेत सध्या अनेक जण व्यवसाय करण्यावर भर देत आहेत. दादरमध्ये सुद्धा एक तरुण स्वतःचा व्यवसाय करत आहे. कॉलेज सांभाळत व्यवसाय करणे तसे तर फार कठीण काम आहे. परंतु दादरमधील प्रथमेश मात्र आवडीने हा व्यवसाय करत आहे आणि याच आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून ते दिवसाला अडीच ते तीन हजार रुपये कमावत आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा स्पेशल रिपोर्ट.

advertisement

जीपीएस कॉर्नर असे त्याच्या या फूड स्टॉलचे नाव आहे. याठिकाणी तुम्हाला चिकन पाव, वेफर क्रिस्पी चिकन पाव हे सगळे पदार्थ मिळतात. यांची किंमत फक्त 25 ते 30 रुपये असल्यामुळे दादरकर तरुण मंडळी आवर्जून इथे खायला येतात. दादर स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या आगर बाजार येथे त्याचा हा फूड स्टॉल आहे.

advertisement

या जीपीएस कॉर्नरमध्ये तुम्हाला बटर चिकन पाव, चीज बटर चिकन पाव, पेरी पेरी मायो चिकन बटर पाव, तंदुरी मायो बटर चिकन पाव, चिकन कटलेट पाव, चीज चिकन कटलेट पाव हे सगळे पदार्थ इथे मिळतात. तुम्हाला इथे स्पेशल म्हणजे दहाहून अधिक प्रकारची मॅगी सुद्धा मिळेल. मॅगीची किंमत सुद्धा इथे फक्त 40 रुपयांपासून सुरू होते. इथले वेफर्स पाव तर सगळ्यांना खूप आवडतात.

advertisement

प्रथमेश शिरवाडकर हा तरुण दादरमधीलच रहिवासी आहे. तो सध्या फायनान्स या विषयात मास्टर्स करत असून कॉलेज करत करत तो संध्याकाळी हे जीपीएस फूड कॉर्नर चालवतो. यातून त्याला दिवसाचे अडीच ते तीन हजार रुपये मिळतात.

निवडणुकीची धामधूम, नेते अन् कार्यकर्त्यांकडून पांढऱ्या कपड्यांना मोठी मागणी, VIDEO

'कॉलेज सांभाळत व्यवसाय करणं थोडं कठीण जात आहे. परंतु इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो. दिवसभर कॉलेज करून मी संध्याकाळी हा माझा फूड स्टॉल सुरू करतो. कॉलेजच्या तरुणांमध्ये वेफर पाव खूप फेमस आहे. त्यामुळे दादरमधील तरुण हमखास माझ्याकडे वेफर पाव खायला येतात. सुरुवातीला तर माझ्या घरच्यांचा या व्यवसायाला विरोध होता. परंतु आता ग्राहकांचा चांगला प्रतिसाद पाहून त्यांनाही माझा अभिमान वाटतो,' लोकल18 शी बोलताना त्याने सांगितले. तर मग तुम्हाला सुद्धा मस्त गरमागरम चिकन पाव किंवा वेफर पावची चव चाखायची असेल तर तुम्ही प्रथमेशच्या या जीपीएस फूड कॉर्नरला नक्की भेट देऊ शकता.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
शिक्षणासोबत व्यवसाय, दादरमध्ये मराठी मुलगा चालवतोय फूड स्टॉल, मिळतात खास पदार्थ, दिवसाची कमाई...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल