निवडणुकीची धामधूम, नेते अन् कार्यकर्त्यांकडून पांढऱ्या कपड्यांना मोठी मागणी, VIDEO

Last Updated:

politician dress up style - कपड्यांना फार महत्त्व आहे. चहाच्या टपरीसोबतच लाँड्रीवालाही ठरलेला आहे. त्याच्याकडूनच हे कपडे स्वच्छ धुऊन स्टार्च केले जाते. सगळीकडे सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान कडक पांढऱ्या कपड्याना मोठी मागणी सध्या पाहायला मिळत आहे.

+
प्रतिकात्मक

प्रतिकात्मक फोटो

सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग - अंगावरील पोशाखामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व खुलते. कपडे स्वच्छ आणि नीटनेटके असले, तर त्या व्यक्तीकडे लोकही आकर्षित होतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या या धामधुमीत अनेक उमेदवार प्रचारासोबतच आपल्या अंगावरील पोशाखावर खास लक्ष देत आहेत. पांढरा शुभ्र स्टार्च केलेला कपडा अंगावर परिधान करून उमेदवार तथा त्यांचे काही कार्यकर्तेही मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
advertisement
कपड्यांना फार महत्त्व आहे. चहाच्या टपरीसोबतच लाँड्रीवालाही ठरलेला आहे. त्याच्याकडूनच हे कपडे स्वच्छ धुऊन स्टार्च केले जाते. सगळीकडे सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान कडक पांढऱ्या कपड्याना मोठी मागणी सध्या पाहायला मिळत आहे.
निवडणुकीच्या काळात उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गावोगावी प्रचार करत फिरत असतात. आपण रुबाबदार कपड्यात एक वजनदार माणूस वाटावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे आपल्याकडे लोकांचे एक आकर्षण असावे यासाठी उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते तशा रुबाबदार कपड्याकडे जास्त लक्ष देत असतात. निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांच्याही पोशाखामध्ये पाहायला मिळतो.
advertisement
सध्या बाजारात दिवाळीपेक्षा कपडे खरेदीसाठी नेते व कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत असल्याचे कापड व्यावसायिक सांगत आहेत. कार्यकर्त्यांना कपडे देखील तसेच कडक हवे असल्याची मागणी ते कापड व्यावसायिकांकडे करत आहेत. त्यामुळे बाजारात सध्या कापड दुकानामध्ये गर्दी देखील पाहायला मिळत आहे.
advertisement
कार्यकर्ते व उमेदवार हे लोकांसमोर एक वेगळी छाप पडेल असे कपडे हवे असल्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र सध्या बाजारात पाहायला मिळत आहे. त्याचमुळे सध्या बाजारात या कपड्यांना मागणी वाढली आहे. यामध्ये कुर्ता, पायजमा तर हवाच पण तोदेखील कडकच असायला हवा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे यासाठी स्टार्चच्या कपड्यांना प्राधान्य दिले जात आहे.
advertisement
काही नेते पदाधिकारी पांढऱ्या शर्टला प्राधान्य देत आहेत. यासाठी शहजादा, मिनिस्ट्री खादी या कापडाचा वापर केला जात आहे. या कडक पांढऱ्या शर्ट वर जॅकेटचा ट्रेंड अलीकडेच वाढलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये पांढऱ्या रांगासोबत इतरही सोबर रंगाची मागणी ग्राहक करतात. यामध्ये सियाराम शर्ट 999 पासून सुरुवात तर जिम कापड 1500 पासून सुरुवात, ओक्झाम्बर 1299 रुपये, असे या कपड्यांचे दर आहेत, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
निवडणुकीची धामधूम, नेते अन् कार्यकर्त्यांकडून पांढऱ्या कपड्यांना मोठी मागणी, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement