TRENDING:

इराण युद्धात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 10 रुपयांनी डिझेलवरच्या एक्साइज ड्युटीत कपात, पेट्रोलचं काय?

Last Updated:

इराण-इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धसंघर्ष सुरू असताना आता केंद्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

advertisement
इराण-इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्धसंघर्ष सुरू असताना आता केंद्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एक्साइज ड्युटीत कपात केली आहे. एकीकडे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या वर असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल-डिझेल
पेट्रोल-डिझेल
advertisement

मात्र, ऐन संकटकाळात केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाचा विचार करत पेट्रोलवर ३ रुपये आणि डिझेलवर चक्क १० रुपये प्रति लिटर एक्साइज ड्युटीत कमी केलं आहे. या निर्णयामुळे महागाईने होरपळणाऱ्या जनतेला मोठा आधार मिळणार का हे पाहावं लागणार आहे. सध्या तरी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही कपात करण्याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

advertisement

इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत असताना भारतात मात्र काही ठिकाणी या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. एक्साइज ड्युटी कमी केल्यानंतर इंधन खरेदी करणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम इंधनाच्या किमतींवर होईल, ज्यामुळे तेल कंपन्या आणि जनता या दोघांवरील भार कमी होईल. याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, जर तेल कंपन्यांनी किमती वाढवल्या नाहीत, तर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे किंवा कमी होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
इराण युद्धात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 10 रुपयांनी डिझेलवरच्या एक्साइज ड्युटीत कपात, पेट्रोलचं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल