TRENDING:

कुंभार व्यावसायिकांच्या आयुष्यातील प्रकाश होतोय मंद, सांगलीतील परिस्थिती नेमकी काय?, व्यावसायिक म्हणाले...

Last Updated:

sangli diwali - परराज्यातून येणाऱ्या पणत्यांमुळे सांगलीच्या पारंपरिक कुंभार गल्लीतील व्यावसायिकांची नेमकी काय स्थिती आहे, याबद्दल सांगलीतील कुंभार व्यावसायिक लक्ष्मी कुंभार यांच्याशी लोकल18 टीमने संवाद साधला.

advertisement
प्रीती निकम, प्रतिनिधी
advertisement

सांगली - दिवाळीचा सण सुरू झाला आहे. दिवाळी म्हणजेच दीपोत्सव. पणत्यांविना या उत्सवाची चमक अपूर्णच असते. सांगलीच्या सहा गल्ल्यांपैकी एक म्हणजे "कुंभारगल्ली". पूर्वी याच कुंभार गल्लीत 'फिरत्या चाकावर देशी पणतीला' आकार देण्याची लगबग सुरू असायची. कुंभारगल्लीत मोठ्या प्रमाणात मातीचे दिवे बनवले जायचे. पण आता काळ बदलला. कुंभार लोक पणत्या बनविण्याऐवजी बाहेरून तयार दिवे आणून विकू लागले आहेत.

advertisement

बाजारपेठातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या चकाकीत मातीच्या दिव्यांचा आणि कुंभार व्यावसायिकांच्या आयुष्यातील प्रकाश मंद होत असल्याचे दिसून येत आहे. परराज्यातून येणाऱ्या पणत्यांमुळे सांगलीच्या पारंपरिक कुंभार गल्लीतील व्यावसायिकांची नेमकी काय स्थिती आहे, याबद्दल सांगलीतील कुंभार व्यावसायिक लक्ष्मी कुंभार यांच्याशी लोकल18 टीमने संवाद साधला.

यावेळी त्या म्हणाल्या की, "गणपती मंदिराच्या पाठीमागे दिवाळीनिमित्त आम्ही स्टॉल लावला आहे. आम्ही पिढ्यानपिढ्या कुंभार व्यावसाय करतोय. आजकाल मार्केटमध्ये बाहेरील देशातून लाइटिंगचे प्रकार आले आहेत. बाहेरून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माळाच्या व्हरायटी येत आहेत. दिसायला नाजूक आणि आकर्षक असणारे बाहेरील राज्यातून येणारे प्रकार ग्राहकांना आवडत आहेत. यामुळे कुंभार जे दिवे आणि पणत्या हातावर तयार करत होते, त्याची मागणी कमी होत चालली आहे. त्यामुळे आमच्यावर नाजूक परिस्थिती आली आहे.

advertisement

दिवाळी पाडव्याला पतीला पत्नी का ओवाळते?, जाणून घ्या, यामागचं कारण..

खरंतर आपल्या मातीपासून बनवलेल्या पणत्या दिवाळीला आपण परंपरेने वापरतो. कुंभार कारागिरांनी तयार केलेल्या पणत्या या अधिक टिकाऊ असतात. तसेच या पणत्या, दिवे मातीचे असतात. त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. असे म्हणत लोकांनी कुंभार व्यवसायिकांनी तयार केलेल्या पणत्या खरेदी कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले."

advertisement

तसेच "आम्ही कुंभार व्यवसायिक पूर्वी सर्व प्रकारचा मातीचा माल तयार करत होतो आणि विकत होतो. परंतु अलीकडे आलेल्या पीओपी आणि इतर प्रकारच्या मालामुळे कुंभार कारागिरांच्यावर संकट आले आहे. आता बऱ्याच प्रकारच्या वस्तू बाहेरून आपल्या बाजारपेठेत येतात. त्यामुळे आम्ही कुंभार व्यवसायिक आता फक्त नागोबा तयार करण्यापुरतेच उरलो आहोत. परंपरेने चालत आलेल्या कुंभार व्यवसायामध्ये आता कोणतेही भवितव्य दिसत नाही. त्यामुळे आमच्या पुढच्या पिढ्याही आता या व्यवसायापासून दूर चालल्या आहेत," असेही त्या यावेळी म्हणाले.

advertisement

सांगलीची ऐतिहासिक सहा गल्ल्यांपैकी एक असणारी कुंभार गल्लीतील कुंभार व्यावसायिक दीपावलीच्या काळात सांगलीच्या प्रसिद्ध गणपती मंदिराच्या पाठीमागे मातीचे दिवे पणत्या विकण्यासाठी आपले स्टॉल थाटतात. मात्र, आधुनिकतेच्या युगात मातीच्या दिव्यांची जागा विद्युत दिव्यांनी घेतली आहे. अशा स्थितीत कुंभार कारागिरांसमोर उदरनिर्वाहाचं संकट गडद झाल्याचे कुंभार व्यावसायिकांनी लोकल18 शी बोलताना सांगितले.

परदेशातून येणाऱ्या दीपमाळा कुंभारांचे मोठे नुकसान करत आहेत. परराज्यातून येणाऱ्या कमी टिकाऊ परंतु आकर्षक आणि नाजूक दिवे ग्राहकांच्या पसंतीत उतरत आहेत. त्यामुळे स्थानिक कुंभारांनी बनवलेल्या मातीच्या साध्या पणत्यांचा खप फारच कमी झाला आहे, असे दिसून येत आहे.

मराठी बातम्या/मनी/
कुंभार व्यावसायिकांच्या आयुष्यातील प्रकाश होतोय मंद, सांगलीतील परिस्थिती नेमकी काय?, व्यावसायिक म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल