TRENDING:

चीनचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका; सप्लायर्स विश्वास बसणार नाही असा गौप्यस्फोट, महागड्या ब्रँड्सचे रहस्य उघड

Last Updated:

ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धात तणाव वाढत असताना, चिनी पुरवठादारांनी सोशल मीडियावर धक्कादायक खुलासे करून खळबळ उडवून दिली आहे. बिर्किन, लुई व्हिटॉनसारख्या जगप्रसिद्ध आणि महागड्या ब्रँड्सच्या उत्पादनांची मूळ किंमत आणि बाजारातील किंमत यातील प्रचंड तफावत उघड करत, त्यांनी अमेरिकेच्या लक्झरी बाजाराला आव्हान दिले आहे.

advertisement
बिजिंग: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क (टॅरिफ) लावल्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध अधिक तीव्र झाले आहे. मात्र या परिस्थितीत चिनी पुरवठादारांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्यामुळे अमेरिकेतील अनेक मोठ्या आणि महागड्या ब्रँड्सच्या व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो.
News18
News18
advertisement

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चिनी पुरवठादारांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये ते बिर्किन (Birkin), लुई व्हिटॉन (Louis Vuitton), चॅनेल (Chanel), एस्टी लॉडर (Estee Lauder) आणि बॉबी ब्राउन (Bobbi Brown) यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सचे मूळ उत्पादन असलेले बॅग्स अत्यंत कमी किमतीत, म्हणजेच त्यांच्या मूळ किमतीच्या केवळ 10 टक्क्यांपर्यंत विकत असल्याचे दिसत आहे.

advertisement

या व्हिडिओंच्या माध्यमातून चिनी पुरवठादारांनी एक प्रकारे ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाला आव्हान दिले आहे. अनेकजण याला चीनची नवी चाल मानत आहेत. ज्याद्वारे ते अमेरिकेतील उच्च श्रेणीच्या (लक्झरी) ब्रँड्सच्या व्यवसायाला नुकसान पोहोचवू इच्छितात.

बिर्किनसाठी बॅग बनवणाऱ्या एका पुरवठादाराने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की बाजारात सुमारे 34,000 डॉलर्स (जवळपास 29 लाख रुपये) किमतीला विकल्या जाणाऱ्या त्यांच्या एका बॅगची खरी किंमत 1,400 डॉलर्स (1.2 लाख रुपये) पेक्षाही कमी आहे. त्यांचे म्हणणे आहे की बॅग बनवणाऱ्यांना यामध्ये फारच कमी नफा मिळतो. कारण ‘लोगो’ (Logo) मुळे मिळणारा बहुतेक नफा ब्रँड्सच्या खिशात जातो.

advertisement

काही व्हायरल व्हिडिओमध्ये चिनी कारखान्यांमध्ये उत्पादन प्रक्रिया देखील दाखवण्यात आली आहे. यामागील उद्देश हा चीनमध्ये तयार होणारे उत्पादन कमी दर्जाचे असते आणि त्यामुळेच त्यांची किंमत कमी असते, हा समज दूर करणे आहे.

याव्यतिरिक्त काही चिनी पुरवठादार आयात शुल्क (इम्पोर्ट ड्यूटीज) स्वतः भरण्याची आणि मोफत शिपिंगची ऑफर देखील देत आहेत. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. ज्यात असा दावा केला जात आहे की अमेरिका चीनविरुद्धचे व्यापार युद्ध जिंकू शकत नाही.

advertisement

सध्या अमेरिकेने चिनी वस्तूंवर 145 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावले आहे. तर चीननेही याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या वस्तूंवर 125 टक्क्यांपर्यंत कर वाढवला आहे. ट्रम्प यांच्याशी कोणताही समझोता करण्याऐवजी चीनने आता एक वेगळी रणनीती अवलंबली आहे. यात अंतर्गत सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे आणि जगभरातील इतर देशांशी आर्थिक भागीदारी वाढवण्यावर भर दिला जात आहे.

advertisement

चीनने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की ते शेवटपर्यंत लढण्यासाठी तयार आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही अमेरिकेच्या भूमिकेचा निषेध केला आहे. त्यांनी जाहीर केले आहे की ते कोणत्याही दबावाला (डोनाल्ड ट्रम्प) बळी पडणार नाहीत. या नवीन घडामोडींमुळे जागतिक स्तरावर व्यापार संबंधांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/मनी/
चीनचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका; सप्लायर्स विश्वास बसणार नाही असा गौप्यस्फोट, महागड्या ब्रँड्सचे रहस्य उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल