फेब्रुवारी 2026 मध्ये सरकारी बँका, खासगी बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या वेगवेगळ्या दरांनी कर्ज देत आहेत. मात्र सर्वात कमी व्याजदर प्रामुख्याने चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांनाच मिळतो, हे लक्षात ठेवावं.
सरकारी बँकांचे होम लोन व्याजदर
बँक ऑफ इंडिया: 7.10% ते 10.25%
बँक ऑफ महाराष्ट्र: 7.10% ते 9.90%
सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 7.10% ते 9.15%
advertisement
इंडियन ओव्हरसीज बँक: 7.10% पासून पुढे
युनियन बँक ऑफ इंडिया: 7.15% ते 9.50%
यूको बँक: 7.15% ते 9.25%
इंडियन बँक: 7.15% ते 9.55%
खासगी बँकांचे व्याजदर
ICICI बँक: 7.45% पासून
HSBC बँक: 7.45% पासून
फेडरल बँक: 7.50% ते 9.50%
कोटक महिंद्रा बँक: 7.70% पासून
HDFC बँक: 7.75% पासून
साउथ इंडियन बँक: 7.80% पासून
तमिळनाड मर्कंटाइल बँक: 7.90% ते 9.30%
अॅक्सिस बँक: 8.00% ते 11.90%
हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे दर
LIC हाऊसिंग फायनान्स: 7.15% पासून
बजाज हाऊसिंग फायनान्स: 7.15% पासून
ICICI होम फायनान्स: 7.50% पासून
PNB हाऊसिंग फायनान्स: 7.50% पासून
टाटा कॅपिटल: 7.50% पासून
गोदरेज हाऊसिंग फायनान्स: 7.60% पासून
आदित्य बिर्ला कॅपिटल: 7.75% पासून
होम लोन घेण्यापूर्वी या गोष्टी तपासा
- फक्त जाहिरातीतला “कमी दर” पाहून निर्णय घेऊ नका.
- तुमचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि प्रोफाइल यावर अंतिम दर ठरतो.
- प्रोसेसिंग फी, लीगल चार्ज, टेक्निकल फी यांसारखे लपलेले खर्च तपासा.
- फ्लोटिंग रेट असल्यास त्याचा रीसेट सायकल (दर किती कालावधीनंतर बदलतो) समजून घ्या.
योग्य तुलना करून कर्ज घेतल्यास तुमची EMI लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते आणि संपूर्ण कर्ज कालावधीत लाखोंची बचत होऊ शकते. घर खरेदीपूर्वी हा छोटा अभ्यास भविष्यातील आर्थिक ताण टाळू शकतो.
