पती-पत्नीच्या रोख व्यवहारांबद्दल टॅक्सचे नियम
घरखर्च किंवा गिफ्ट
पती आपल्या पत्नीला घरखर्च किंवा गिफ्ट म्हणून पैसे देत असेल तर त्यावर नोटीस येत नाही.
गुंतवणुकीसाठी वारंवार कॅश दिल्यास
पत्नी वारंवार कुठे गुंतवणूक करत असेल, तर ते पैसे तिचं उत्पन्न समजलं जातं. यावर टॅक्स भरावा लागतो. तिला इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये हे उत्पन्न दाखवावं लागेल. हे "क्लबिंग ऑफ इन्कम"अंतर्गत पतीच्या उत्पन्नात जोडता येतं. यामुळे टॅक्सची रक्कम वाढू शकते.
advertisement
लेकीच्या नावाने 5 हजारांची SIP करावी की SSY मध्ये गुंतवणूक करावी? जाणून घ्या कुठे जास्त फायदा
रोख व्यवहारांवर इन्कम टॅक्सचे नियम
कलम 269SS आणि 269Tमधल्या तरतुदींनुसार, पती आणि पत्नी यांच्यामधल्या रोखीच्या व्यवहारांची मर्यादा ठरवण्यात आली आहे.
कलम 269SS : पती पत्नीला एकाच वेळी 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम देऊ शकत नाही. त्याहून जास्त रक्कम द्यायची असेल तर चेक, NEFT, RTGS माध्यमातून व्यवहार करावेत.
कलम 269T : 20 हजारांपेक्षा जास्त रक्कम उसनी घेतलेली परत करायची असेल, तर ती बँकिंग चॅनलद्वारे करावी.
खास सवलत : पती पत्नी हे जवळचं नातं असल्याने या कलमांतर्गत पेनल्टी लागत नाही; पण त्या नियमांचं पालन पारदर्शकतेसाठी आवश्यक आहे.
पत्नीला रोख रक्कम देण्याची मर्यादा
घरखर्चासाठी - यासाठी कोणतीही मर्यादा नाही. पती पत्नीला घरखर्चासाठी कितीही रक्कम देऊ शकतो. ती टॅक्सेबल नसते. हा पतीच्या उत्पन्नाचा भाग मानला जातो.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, 1500 की 2100...नवीन वर्षात तुमच्या खात्यात किती पैसे येणार?
गुंतवणुकीसाठी - पतीने दिलेल्या पैशांतून पत्नी फिक्स्ड डिपॉझिट, शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यात गुंतवणूक करत असेल तर त्यावर टॅक्स द्यावा लागतो. जर पतीने पत्नीला वार्षिक एक लाख रुपये दिले तर ते पतीच्या उत्पन्नात जोडून करवसुली केली जाते.
रोखीच्या व्यवहारात खबरदारी
रेंटल इन्कम : पत्नीला दिलेल्या पैशांचा वापर भाडं किंवा प्रॉपर्टी खरेदीसाठी केला, तर ते पत्नीचं उत्पन्न समजून त्यावर टॅक्स भरावा लागेल.
गिफ्ट टॅक्स नियम : पतीने पत्नीला गिफ्ट म्हणून दिलेल्या पैशांवर टॅक्स लागत नाही.
नोटीस येण्याची शक्यता
पतीने पत्नीला दिलेल्या पैशांचा वापर करबचतीसाठी केला आहे, असं इन्कम टॅक्स विभागाच्या लक्षात आल्यास ते तुम्हाला नोटीस पाठवू शकतात.
20 हजारांपेक्षा जास्त रकमेचा रोखीने व्यवहार केल्यास त्यावर इन्कम टॅक्स विभाग दंड आकारू शकतो; पण पती पत्नी, आई वडील व मुलं आणि भाऊ बहीण अशा नात्यांमधल्या रोखीच्या व्यवहारांसाठी दंड आकारला जात नाही.
टॅक्स नोटीसपासून बचावाचे उपाय
20,000 रुपयांपेक्षा जास्तीचे व्यवहार रोखीने करू नये.
त्यासाठी बँकेतून चेक NEFT किंवा RTGS करावं.
पत्नीच्या गुंतवणुकीची माहिती टॅक्स रिटर्नमध्ये अचूक भरावी.
पत्नीने काही संपत्ती खरेदी केली असेल तर त्यावरचा टॅक्स भरावा.