Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, 1500 की 2100...नवीन वर्षात तुमच्या खात्यात किती पैसे येणार?

Last Updated:

खरं तर निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला आहे. या हप्त्यात महिलांच्या खात्यात फक्त 1500 रूपयेच जमा झाले आहेत.पण सरकारने निवडणुकीनंतर 2100 रूपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती.

ladki bahin yojana
ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात 1500 रूपयांचे सहा हप्ते जमा झाले आहे.आता हेच हप्ते नवीन वर्षात देखील महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. पण निवडणूकी दरम्यान सरकारने महिलांना 1500 रूपयांत वाढ करून 2100 रूपये देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप महिलांना 2100 रूपयांचा हप्ता आलेला नाही आहे. त्यामुळे नवीन वर्षात तरी महिलांच्या खात्यात आता 2100 रूपये जमा होणार की 1500 रूपयेच येणार? असा सवाल महिला उपस्थित करत आहेत.
खरं तर निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला आहे. या हप्त्यात महिलांच्या खात्यात फक्त 1500 रूपयेच जमा झाले आहेत.पण सरकारने निवडणुकीनंतर 2100 रूपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतल्याची माहिती राजकीय सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे महिलांच्या खात्यातही नवीन वर्षात 1500 रूपयेच जमा होण्याची शक्यता आहे.
advertisement

'या' तारखेला खात्यात पैसे येणार?

महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही.पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे.गोड यासाठी कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. सरकार महिलांना मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रात आणखीण गोड होणार आहे.
advertisement
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे.त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे. त्यामुळे हे निकष काय आहेत? हे जाणून घेऊयात.
advertisement

अर्ज बाद होण्याचे निकष काय?

  • कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न
  • घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन
  • शासकीय नोकरी अलकाना घेतलेला योजनांचा लाभ
  • एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही
  • ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही
  • ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार
advertisement
मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो, 1500 की 2100...नवीन वर्षात तुमच्या खात्यात किती पैसे येणार?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement