TRENDING:

Success Story : पारंपरिक व्यवसायाला विदेशी बाजारपेठेचं स्वरूप, दैवशाला बनवतात लाकडी वस्तू, महिन्याला 2 लाखांची उलाढाल

Last Updated:

या व्यवसायाच्या जोरावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. महिन्याला तब्बल 2 लाखांची उलाढाल त्या या व्यवसायातून करतात.

advertisement
पुणे :  मूळच्या जामखेड तालुक्यातील दैवशाला घोळवे सध्या पुण्यात लाकडी वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहेत. चार पिढ्यांपासून चालत आलेला हा पारंपरिक व्यवसाय त्यांनी मोठ्या बाजारपेठेत उभा केला आहे. काटवट, बेलन तसेच स्वयंपाकघरात लागणाऱ्या विविध लाकडी वस्तू त्या स्वतः तयार करतात आणि पुण्यासह अनेक ठिकाणी विक्रीसाठी पाठवतात. कुटुंबात कोणीही शिक्षित नाही, तसेच शेत जमीनही नाही. मात्र या व्यवसायाच्या जोरावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. महिन्याला तब्बल 2 लाखांची उलाढाल त्या या व्यवसायातून करतात. त्यांच्या वस्तूंना देशभरासह प्रदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यांच्या या व्यवसायाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement

दैवशाला घोळवे यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबाचा हा पारंपरिक व्यवसाय गेल्या चार पिढ्यांपासून सुरू आहे. दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे संपूर्ण कुटुंब या व्यवसायावरच अवलंबून आहे. या कामामध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागते. लाकूड आणण्यापासून ते कापणे, आकार देणे आणि अंतिम रूप देणे या प्रत्येक प्रक्रियेस वेळ आणि कौशल्य लागते.

Success Story: करिअर कशात करायचं? डेअरिंग केलं अन् 16 हजाराची नोकरी सोडली, आज कमाई 15 लाख, Video

advertisement

जेवढी मेहनत या वस्तू बनवण्यामागे लागते त्याप्रमाणे पैसे मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. साधारणपणे व्यवसायासाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्या गुंतवणुकीतून महिन्याला सुमारे दोन लाख रुपयांची उलाढाल होते. सर्व खर्च वजा केल्यानंतर महिन्याकाठी सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

लाकडी वस्तूंना देश-विदेशातून मागणी

advertisement

दैवशाला घोळवे यांनी तयार केलेल्या लाकडी वस्तूंना राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पुण्यात भरल्या जाणाऱ्या भीमथडी जत्रा येथे त्यांच्या स्टॉलवरील वस्तूंचा एका ग्राहकाने काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या उत्पादनांना परदेशातूनही मागणी येऊ लागली. विशेषत काटवट, पळपुट, बेलन आणि इतर पारंपरिक लाकडी वस्तूंना ग्राहकांची पसंती मिळत आहे. घोळवे यांनी इंडोनेशिया, अमेरिका आणि लंडनसारख्या ठिकाणी आपली उत्पादने पाठवली असून, पारंपरिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपली ओळख निर्माण केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Success Story : पारंपरिक व्यवसायाला विदेशी बाजारपेठेचं स्वरूप, दैवशाला बनवतात लाकडी वस्तू, महिन्याला 2 लाखांची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल