TRENDING:

VIDEO : 1.5 तासात कमावले 65 रुपये; Blinkit डिलिव्हरी बॉयचा 'तो' व्हिडिओ का होतोय व्हायरल?

Last Updated:

सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने आपल्या कामाचा पहिला दिवस कॅमेऱ्यात कैद केला आणि त्यातून त्याने दिलेला संदेश आज लाखो लोकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे.

advertisement
मुंबई : सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेकदा ऑनलाईन अ‍ॅप्सवरून जेवण किंवा किराणा सामान ऑर्डर करतो. काही मिनिटांतच दारावरची बेल वाजते आणि हसतमुखाने एक तरुण आपली ऑर्डर आपल्या हातात सोपवतो. 'डिलिव्हरी पार्टनर' म्हणून काम करणाऱ्या या तरुणांकडे आपण अनेकदा एक 'सर्व्हिस' म्हणून पाहतो, पण त्या हेल्मेट आणि बॅगच्या मागे एक स्वप्न, एक संघर्ष आणि स्वाभिमानाची एक मोठी गोष्ट दडलेली असते. ज्याबद्दल अनेकांना माहित नसतं आणि आपण त्याचा विचार देखील करत नाही.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने आपल्या कामाचा पहिला दिवस कॅमेऱ्यात कैद केला आणि त्यातून त्याने दिलेला संदेश आज लाखो लोकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे. ही गोष्ट आहे मनीष अस्वार या तरुणाची, ज्याने एका साध्या व्लॉगच्या माध्यमातून 'कामाचा सन्मान' म्हणजे काय, हे जगाला दाखवून दिलंय, शिवाय कोणतंही काम लहान मोठं नाही, फक्त मेहनत करणं गरजेचं आहे हे शिकवते.

advertisement

20 फेब्रुवारी रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मनीष आपल्या 'ब्लिंकिट' (Blinkit) मधील पहिल्या शिफ्टचा अनुभव सांगताना दिसतो. विशेष म्हणजे, त्याच्याकडे कोणतीही महागडी बाईक नाही. मनीष आपल्या मित्राच्या सायकलवर मागे बसून डिलिव्हरी पूर्ण करण्यासाठी गल्लोगल्ली फिरताना दिसतोय.

व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर कोणताही थकवा किंवा संकोच नाही, तर एक वेगळाच उत्साह आहे. तो प्रेक्षकांशी गप्पा मारत सांगतो, "आज माझा ब्लिंकिटमधील पहिला दिवस आहे. पहिली ऑर्डर लागली आणि आम्ही ती वेळेत देऊनही आलो. आता ही दुसरी ऑर्डर निघालीये."

advertisement

या डिलिव्हरी दरम्यान एक असा प्रसंग घडला जिथे कुणीही सामान्य तरुण संकोचला असता. मनीषला आलेली एक ऑर्डर चक्क त्याच्या स्वतःच्या शेजाऱ्याची होती. अनेकांना वाटतं की, ओळखीच्या लोकांसमोर असं काम करताना आपली प्रतिष्ठा कमी होईल. पण मनीषचे विचार वेगळेच होते.

तो म्हणतो, "मला वाटलं होतं कुणालाच कळणार नाही, पण आता तर सर्वांनाच कळलंय. पण मित्रांनो, कामात कधीच लाज धरू नये." मनीषचे हे साधे पण प्रभावी शब्द आज इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरले आहेत. कोणत्याही कामात छोटा-मोठा असा भेद नसतो, हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केलंय.

advertisement

1.5 तासांची कमाई: आकडा छोटा, पण जिद्द मोठी

मनीषने आपल्या दीड तासाच्या पहिल्या शिफ्टमध्ये 65 रुपये कमावले. त्याने तरुणांना एक महत्त्वाचा सल्ला दिला की, तुम्ही पार्ट-टाईममध्ये काहीही करू शकता. "मी सायकल वापरून, मेहनत करून दीड तासात 65 रुपये कमावले आहेत," असं तो अभिमानाने सांगतो. जरी काही लोकांनी या कमाईला 'शोषण' म्हटलं असलं, तरी बहुतेकांनी मनीषच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक केलंय.

advertisement

22 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्यानंतर कोणताही सामान्य तरुण यशाचं सेलिब्रेशन पार्ट्या करून साजरा करेल. पण मनीषने इथेही सर्वांची मनं जिंकली. व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या आनंदात त्याने आपल्या भागातील भटक्या कुत्र्यांना जेवण दिलं. त्याच्या या साधेपणामुळे नेटकरी आता त्याला 'रिअल हिरो' म्हणत आहेत.

"देव तुला करोडो रुपये देवो, तुझा स्वभाव खूप छान आहे," असं एका युजरने म्हटलंय. तर "काम महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ते कसं करता हे महत्त्वाचं आहे. प्रेरणादायी!" अशी कमेंट दुसऱ्या एकाने केली आहे. आजच्या 'शो-ऑफ'च्या जगात मनीष अस्वारसारखी मुलं जमिनीवर राहून कष्टाची किंमत शिकवत आहेत. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणं ही केवळ नोकरी नाही, तर तो एका स्वाभिमानी प्रवासाचा भाग आहे, हेच या व्हिडिओतून अधोरेखित होतंय.

मराठी बातम्या/मनी/
VIDEO : 1.5 तासात कमावले 65 रुपये; Blinkit डिलिव्हरी बॉयचा 'तो' व्हिडिओ का होतोय व्हायरल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल