TRENDING:

Gold Price भोपळा फुटणार, जगातल्या सर्वात मोठ्या बँकरची खळबळजनक भविष्यवाणी; सोने रेकॉर्ड रिस्कवर

Last Updated:

Gold Market: सोन्याने नवा विक्रम करत $3,759 प्रति औंस गाठलं असलं तरी तज्ज्ञांनी बबल फुटण्याचा इशारा दिला आहे. गुंतवणूकदार सोन्याकडे धावत असतानाच बाजारात भीतीचं सावट पसरलं आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: मंगळवारी सोन्याच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. स्पॉट गोल्ड $3,759.02 प्रति औंसपर्यंत गेले. नंतर ते किंचित खाली येऊन ते $3,743.39वर स्थिरावले. कमकुवत अमेरिकन डॉलरमुळे डिमांड वाढली आणि त्यामुळे डिसेंबर डिलिव्हरीसाठीचे गोल्ड फ्यूचर्स 0.1% वाढून $3,779.50पर्यंत पोहोचले.

advertisement

याचदरम्यान जगातील सर्वात मोठ्या बँकेचे सीईओ जेपी मॉर्गन (JPMorgan) चे जेमी डायमोन (Jamie Dimon) यांनी मुंबईत झालेल्या JPMorgan India Investor Conference मध्ये इशारा दिला की- गोल्डपासून ते बिटकॉइनपर्यंत सर्वच अॅसेट्समध्ये बबलचं संकट वाढत आहे.

advertisement

जेमी डायमोनचा इशारा

डायमोन यांनी CNBC-TV18 ला सांगितले की- आपण एका बबलसदृश परिस्थितीकडे चाललो आहोत. मला नेमकं सांगता येत नाही आपण कुठे आहोत; पण सध्या केवळ पॉझिटिव्ह सेंटीमेंटमुळे अॅसेट प्राइसेस वर ढकलले जात आहेत रेकॉर्ड स्टॉक्स, रेकॉर्ड गोल्ड आणि रेकॉर्ड क्रिप्टो.

advertisement

डायमोन यांनी हे वक्तव्या अशा वेळी केले आहे जेव्हा गुंतवणूकदार सेफ-हेवन अॅसेट्सकडे वळत आहेत आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून आणखी दरकपातीची अपेक्षा करत आहेत. फेडने मागील आठवड्यात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली होती आणि पुढे अधिक सवलतीचे संकेत दिले होते. मात्र या धोरणावर पॉलिसी मेकर्समध्ये मतभेद कायम आहेत.

advertisement

टेक्निकल लेव्हल्स आणि शॉर्ट-टर्म ट्रेंड

OANDA चे सीनियर मार्केट अॅनालिस्ट केल्विन वोंग यांनी सांगितले की - शॉर्ट-टर्म ट्रेंड अजूनही बुलिश आहे. पण इथून टेक्निकल पुलबॅकची शक्यता आहे. $3,710 आणि $3,690 हे महत्त्वाचे सपोर्ट लेव्हल्स लक्षात घ्यावे लागतील.

दरम्यान ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट एस. नरेन (S. Naren) यांनीही इशारा दिला. त्यांनी गोल्ड आणि सिल्व्हरच्या जोरदार रॅलीला “वार्निंग साइन” म्हटले आणि सांगितले की रॅलीनंतर खरेदी करणं दीर्घकाळात नुकसानकारक ठरू शकतं, कारण मेटल्स ना इनकम देतात ना पारंपरिक व्हॅल्युएशनमध्ये बसतात.

गुंतवणूकदारांसाठी धडा

डायव्हर्सिफिकेशन सर्वात महत्त्वाचं आहे. लोक अनेकदा उच्च भावात खरेदी करतात आणि खाली गेल्यावर विकतात हेच सर्वात मोठं रिस्क आहे, असे नरेन यांनी सांगितले. आता गुंतवणूकदारांची नजर फेड चेअर जेरोम पॉवेल (Jerome Powell) यांच्या पुढील वक्तव्यावर आहे. जे मौद्रिक धोरणाच्या दिशेला आणखी संकेत देऊ शकते. नवीन फेड गव्हर्नर स्टीफन मिरन (Stephen Miran) यांनी म्हटलं की जर फेडने आणखी आक्रमक कपात केली नाही तर लेबर मार्केटवर दबाव वाढू शकतो.

मराठी बातम्या/मनी/
Gold Price भोपळा फुटणार, जगातल्या सर्वात मोठ्या बँकरची खळबळजनक भविष्यवाणी; सोने रेकॉर्ड रिस्कवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल