TRENDING:

Gold Price : एक लाख तर काहीच नाही, इस्रायल-इराणचा संघर्ष सुरू राहिल्यास किती महाग होणार सोनं?

Last Updated:

Gold Price : जागतिक भू-राजकीय तणाव आणि देशांतर्गत चलन रुपयातील कमकुवतपणा यामुळे सोन्याने देशांतर्गत बाजारात एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला

advertisement
Gold Price :  मागील आठवड्यात,  शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतींनी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याने शुक्रवारी पहिल्यांदाच एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. जागतिक भू-राजकीय तणाव आणि देशांतर्गत चलन रुपयातील कमकुवतपणा यामुळे सोन्याने देशांतर्गत बाजारात एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला.
News18
News18
advertisement

तज्ज्ञांच्या मते, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे आकर्षित झाले आहेत. एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा यांनी सांगितले की, इराणी तळांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याने सोन्याच्या किमती वाढण्यात मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी सांगितले की जर तणाव आणखी वाढला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 3500 डॉलरपर्यंत जाऊ शकते.

advertisement

रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याची किंमत वाढेल

दुसरीकडे, डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणा आणि भारतीय रुपयातील घसरण यामुळे देखील सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक जतिन त्रिवेदी यांच्या मते, रुपया प्रति डॉलर 60 पैशांनी घसरून 86.10 रुपयांवर पोहोचला आहे, ज्यामुळे आयात केलेल्या सोन्याची किंमत आणखी वाढली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची वाढ तीव्र झाली आहे.

advertisement

सोन्यातील ही वाढ केवळ भू-राजकीय कारणांमुळे नाही तर ती सट्टेबाजीशी देखील जोडलेली आहे. ज्युलियस बेअरचे संशोधन प्रमुख कार्स्टेन मेनके यांच्या मते अलिकडील सोन्याच्या दरवाढीचे प्रमुख कारण अल्गोरिथमिक ट्रेडिंग आणि सट्टेबाजीचे सौदे आहेत, खरी मागणी नाही. त्यांनी असेही म्हटले की ऐतिहासिकदृष्ट्या भू-राजकीय संकटांमध्ये सोने नेहमीच विश्वसनीय राहिले नाही.

जानेवारीपासून सोन्याने दिलाय 31 टक्के परतावा

advertisement

2025 च्या सुरुवातीपासून सोन्याने सुमारे 31 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे तो या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मालमत्तेपैकी एक आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीजचे एनएस रामास्वामी म्हणाले की, नजीकच्या भविष्यात सोन्याच्या किमती 1,02, 000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. त्याच वेळी, बँक ऑफ अमेरिका आणि गोल्डमन सॅक्स सारख्या जागतिक गुंतवणूक संस्थांच्या अंदाजानुसार 2026 पर्यंत सोने प्रति औंस 4000 डॉलर्स ओलांडू शकते.

advertisement

अस्थिर जागतिक परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चिततेच्या दरम्यान, सोने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून उदयास आले आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत त्याच्या किमतीत तेजू राहू शकते.

मराठी बातम्या/मनी/
Gold Price : एक लाख तर काहीच नाही, इस्रायल-इराणचा संघर्ष सुरू राहिल्यास किती महाग होणार सोनं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल