अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, मंगळवारी याच सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 96 हजार 450 रुपये होता. यापूर्वी 11 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात एकाच दिवसात 6,250 रुपयांची मोठी वाढ झाली होती. जी आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ मानली जाते.
या वर्षात सोन्याच्या दरात 23% ची वाढ
1 जानेवारी 2025 रोजी सोन्याचा भाव 79,390 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या दरात 18,710 रुपयांची म्हणजेच सुमारे 23.5% नी वाढ झाली आहे. 99.5% शुद्धतेचे सोने देखील आता 97,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर मंगळवारी याचा भाव 96,000 रुपये होता.
advertisement
चांदीच्या दरातही मोठी वाढ
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. बुधवारी चांदी 1,900 रुपयांनी वधारून 99,400 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचली. आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी चांदीचा भाव 97,500 रुपये प्रति किलो होता.
चीनचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका; सप्लायर्स विश्वास बसणार नाही असा गौप्यस्फोट
सोन्याच्या किमती का वाढत आहेत?
एलकेपी सिक्युरिटीजचे जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, एमसीएक्सवर सोन्याचा भाव 95,000 रुपयांच्या जवळपास आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात (COMEX) तो 3,300 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढता तणाव आणि गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीचा शोध घेणे. कोटक सिक्युरिटीजच्या कायनात चैनवाला यांनी सांगितले की, अमेरिकेने चीनच्या निर्यात नियमांना अधिक कठोर केले आहे. ज्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि लोक सोन्याकडे आकर्षित होत आहेत.
वाढीची इतर कारणे काय आहेत?
-डॉलर कमकुवत होत आहे. ज्यामुळे सोने महाग होत आहे.
-अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची शक्यता वाढत आहे.
- फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष पॉवेल यांचे भाषण आणि अमेरिकेच्या नवीन आर्थिक आकडेवारीवर सर्वांचे लक्ष आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती आहे?
- सोने 3,318 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले. जो आतापर्यंतचा उच्चांक आहे.
- नंतर थोडीशी घसरण होऊन ते 3,299.99 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होते.
- चांदी देखील सुमारे 2% नी वाढून 32.86 डॉलर प्रति औंस झाली.