TRENDING:

Gold Silver Price News: सोनं-चांदीमध्ये मोठा गेमचेंजर बदल, एका रात्रीत नोटीस आली अन् त्यानंतर....

Last Updated:

Gold Silver News:जागतिक कमोडिटी मार्केटमधून गुरुवारी रात्री एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली असून, त्याचे पडसाद भारतीय सराफा बाजारातही उमटण्याची शक्यता आहे.

advertisement
Gold Silver News:   जागतिक कमोडिटी मार्केटमधून गुरुवारी रात्री एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली असून, त्याचे पडसाद भारतीय सराफा बाजारातही उमटण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठ्या डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज 'CME ग्रुप'ने सोने (Gold), चांदी (Silver) आणि प्लॅटिनमच्या फ्युचर्स ट्रेडिंगमधील 'मार्जिन'मध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल ६ मार्च २०२६ रोजीचा व्यवहार संपल्यानंतर लागू होईल.
Gold Silver : सोनं-चांदीमध्ये मोठा गेमचेंजर बदल, एका रात्रीत नोटीस आली अन् त्यानंतर....
Gold Silver : सोनं-चांदीमध्ये मोठा गेमचेंजर बदल, एका रात्रीत नोटीस आली अन् त्यानंतर....
advertisement

नेमका बदल काय?

सोप्या भाषेत सांगायचे तर, आता ट्रेडर्सना सोने-चांदीचे मोठे सौदे (कॉन्ट्रॅक्ट्स) करण्यासाठी पूर्वीपेक्षा कमी पैसे (मार्जिन) जमा करावे लागतील. CME ग्रुपने सोन्याच्या आणि चांदीच्या मार्जिनमध्ये तब्बल २२%, तर प्लॅटिनमच्या मार्जिनमध्ये १३% कपात केली आहे. याचा अर्थ असा की, कमी भांडवलात गुंतवणूकदारांना आता मोठी पोझिशन घेता येईल.

किंमतींवर काय परिणाम झाला?

advertisement

या बातमीचा परिणाम जागतिक बाजारपेठेत लगेच दिसून आला. शुक्रवारी सकाळी सोन्याच्या दरात १% वाढ होऊन ते ५१३३ डॉलर प्रति औंसवर पोहोचले, तर चांदीच्या दरात २% वाढ होऊन भाव ८४ डॉलर प्रति औंसच्या जवळ गेले. जागतिक बाजारातील या तेजीमुळे भारतीय बाजारपेठेतही सोने-चांदी महागण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मार्जिन म्हणजे काय?

फ्युचर्स मार्केटमध्ये व्यवहार करताना पूर्ण रक्कम न भरता एक ठराविक रक्कम सुरक्षा (Security) म्हणून जमा करावी लागते, त्याला 'मार्जिन' म्हणतात. जेव्हा एक्सचेंज हे मार्जिन कमी करते, तेव्हा बाजारात ट्रेडिंग वाढवण्याचा तो एक प्रयत्न असतो.

advertisement

सामान्य गुंतवणूकदारावर काय परिणाम?

तुम्ही थेट ट्रेडिंग करत नसाल, तरीही ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्जिन कमी झाल्यामुळे ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढतो, ज्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी चढ-उतार पाहायला मिळते. याचा थेट परिणाम दागिन्यांचे दर आणि गोल्ड ईटीएफवर (ETF) होतो.

मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price News: सोनं-चांदीमध्ये मोठा गेमचेंजर बदल, एका रात्रीत नोटीस आली अन् त्यानंतर....
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल