मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे खरेदीसाठी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जळगावला 'सुवर्णनगरी' म्हणून ओळखले जाते. यावर्षी बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक सोन्या-चांदीच्या राख्या उपलब्ध आहेत, पण सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 4 हजार रुपये प्रति तोळा इतका वाढल्याने खरेदीदारांचे बजेट कोलमडले आहे. अनेक महिलांनी सोन्या-चांदीच्या राख्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
advertisement
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाववाढीचा थेट परिणाम राख्यांच्या खरेदीवर झाला असून, अनेक बहिणींना त्यांच्या आवडीच्या राख्या खरेदी करणे अवघड झाले आहे. माझा भाऊ माझ्यासाठी अनमोल आहे मात्र यंदा भाव एक लाख रुपयांच्या वर गेल्यानं माझं बजेट कोलमडलं आहे, त्यामुळे कमी ग्रॅममध्येच राखी खरेदी करण्याचं समाधान मानावं लागत असल्याची प्रतिक्रिया एका युवतीनं दिली.
रक्षाबंधनासाठी बहिणीला गिफ्ट घ्यायला आलेला भाऊ सोन्या चांदीचे दर पाहून काहीसा हताश झाला. दरवर्षीप्रेमाणे यंदा सोन्या चांदीच्या वस्तूंची छानशी भेट देणं थोडं बजेटच्या बाहेर जात असल्याने तो निराश झाला. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आज सोन्या चांदीचे दर चांगलेच वाढले आहेत. चांदीचे दर प्रति किलोमागे एक लाख 18 हजार रुपये झाले आहेत. तर सोनं प्रति तोळ्यामागे एक लाख चार हजार रुपये किलो आहे.
ही तर फक्त झाली सोन्याची किंमत मात्र त्यावर लागणारा मेकिंग चार्ज, GST या सगळ्यांचा विचार करत हे बजेट आणखी वाढत असल्याने काहीशी निराशा व्यक्त केली आहे. तर काही भाऊ कोसळणाऱ्या मार्केटमध्ये सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल म्हणून आपल्या बहिणीला सोन्या चांदीचे कॉइन भेट म्हणून देत आहेत.
सोन्या चांदीचे भाव वाढल्याने ग्राहक कमी ग्रॅममधील सोन्या चांदीचा ट्रेंड फॉलो करत आहेत. 9 आणि 14 कॅरेटचे सोनं चांदी खरेदी करण्याकडे कल जास्त असल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या चांदीची खरेदी करण्याचं प्रमाण कमी असल्याचं सराफ व्यवसायिकांनी देखील सांगितलं आहे.