TRENDING:

Gold Silver Price: अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधीनं सराफा बाजारात उलथापालथ, सोनं-चांदीच्या दरात उलटफेर, आजचा दर काय?

Last Updated:

Gold Price : अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावरही झाला आहे. या घडामोडीमुळे सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर झाला आहे.

advertisement
जळगाव: जवळपास ४० दिवसाच्या युद्धानंतर अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर होर्मुझ सामुद्रधुनीदेखील खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक देशांना दिलासा मिळणार आहे. तर, अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावरही झाला आहे. या घडामोडीमुळे सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर झाला आहे.
अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधीनं सराफा बाजारात उलथापालथ, सोनं-चांदीच्या दरात उलटफेर, आजचा दर काय?
अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधीनं सराफा बाजारात उलथापालथ, सोनं-चांदीच्या दरात उलटफेर, आजचा दर काय?
advertisement

जागतिक राजकारणातील मोठ्या घडामोडींचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी (Ceasefire) घोषित होताच, सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी अनपेक्षित उसळी घेतली आहे. अवघ्या काही तासांत सोन्याच्या दरात ३ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत. युद्धकाळात डॉलर वधारल्यानं आणि इतर काही कारणांनी सोनं-चांदीचे दर चांगलेच घसरले होते. मात्र, आता शस्त्रसंधीनंतर सोनं-चांदीच्या दरात उसळण आली.

advertisement

सोन्यानं ओलांडला दीड लाखांचा टप्पा...

कालपर्यंत जीएसटीशिवाय १,४७,५०० रुपयांवर असलेले सोन्याचे दर आज १,५१,५०० रुपयांवर पोहोचले आहेत. जर यात जीएसटीचा (GST) समावेश केला, तर सोन्याचा भाव आता १ लाख ५६ हजार ०४५ रुपये इतका झाला आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

चांदीच्या दरातही उसळण...

advertisement

चांदीच्या दरात झालेली वाढ त्याहूनही मोठी आहे. मंगळवारी, २,३७,००० रुपयांवर असलेली चांदी आज थेट २,४७,००० रुपयांवर (जीएसटीशिवाय) पोहचली आहे. जीएसटीसह चांदीचा भाव आता २ लाख ५४ हजार ४१० रुपये इतका झाला आहे. एकाच दिवसात १० हजार रुपयांची वाढ झाल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहक अवाक झाले आहेत.

दर आणखी वाढणार?

सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, जागतिक स्तरावर युद्धाची भीती कमी झाली असली तरी बाजारात निर्माण झालेली अस्थिरता आणि डॉलरच्या मूल्यातील बदलांमुळे ही दरवाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात अजूनही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी आतापासूनच सावध पवित्रा घेतला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price: अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधीनं सराफा बाजारात उलथापालथ, सोनं-चांदीच्या दरात उलटफेर, आजचा दर काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल