TRENDING:

Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यानं गाठला ऑल टाइम हाय, चांदीचा दर काय? एक्सपर्टनेही दिला अलर्ट

Last Updated:

Gold Price: नवीन वर्ष २०२६ च्या पहिल्या १२ दिवसातच सोन्यानं विक्रमी दर गाठला आहे. गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी घडामोड घडली असून सोन्याने आतापर्यंत आपल्या दराचा उच्चांक मोडला आहे.

advertisement
Gold Silver Price: नवीन वर्ष २०२६ च्या पहिल्या १२ दिवसातच सोन्यानं विक्रमी दर गाठला आहे. गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी घडामोड घडली असून सोन्याने आतापर्यंत आपल्या दराचा उच्चांक मोडला आहे. तर, चांदीने देखील दराचा रेकोर्ड ब्रेक केला आहे. जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे पाहण्याचा कल वाढला असून, सोमवारी (१२ जानेवारी) दोन्ही मौल्यवान धातूंनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यानं गाठला ऑल टाइम हाय, चांदीचा दर काय?  एक्सपर्टनेही दिला अलर्ट!
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यानं गाठला ऑल टाइम हाय, चांदीचा दर काय? एक्सपर्टनेही दिला अलर्ट!
advertisement

> सोन्या-चांदीचा नवा विक्रम

आज आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डने (Spot Gold) पहिल्यांदाच ४,६०० डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे. सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत चांदीनेही मुसंडी मारली असून ती ८३.५० डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. औद्योगिक मागणीसोबतच गुंतवणुकीसाठी वाढलेल्या मागणीमुळे चांदीच्या दरात ही मोठी तेजी दिसून येत आहे.

> सोनं-चांदीनं ऑल टाइम हाय का गाठला?

advertisement

जगभरातील वाढती राजकीय अस्थिरता आणि युद्धासदृश परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. तर, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची शक्यता वर्तवली जात असल्याने डॉलरमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीमुळे जागतिक व्यापारात चिंतेचे वातावरण आहे. मध्यवर्ती बँकांची खरेदी: विविध देशांच्या मध्यवर्ती बँका सातत्याने सोन्याचा साठा वाढवत असल्याने बाजाराला बळ मिळत आहे. या कारणांनी सोनं-चांदीच्या दरात ऐतिहासिक उसळण आली आहे.

advertisement

तज्ज्ञ काय म्हणतात?

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे तज्ज्ञ प्रणव मेर यांच्या मते, सराफा बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. बाजारात किंचित घसरण झाल्यास ती खरेदीची उत्तम संधी समजावी असे त्यांनी म्हटले. तर एंजल वनचे प्रथमेश मल्ल्या यांनी सांगितले की, अमेरिकन डॉलरची हालचाल आणि महागाईचा डेटा नजीकच्या काळात किमतींवर परिणाम करेल, पण एकूण कल सकारात्मक राहील.

advertisement

गुंतवणूकदारांच्या नजरा या आठवड्यातील डेटावर

या आठवड्यात भारत, अमेरिका आणि जर्मनीकडून महागाईची आकडेवारी (Inflation Data) जाहीर होणार आहे. तसेच चीनचा व्यापारी डेटा बाजाराची पुढील दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार, २०२६ हे संपूर्ण वर्ष सोने आणि चांदीसाठी संरचनात्मकदृष्ट्या मजबूत राहण्याची चिन्हे आहेत.

मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यानं गाठला ऑल टाइम हाय, चांदीचा दर काय? एक्सपर्टनेही दिला अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल