प्रश्न 1: FD वर TDS चे नियम काय आहेत?
उत्तर: जेव्हा तुम्ही बँकेत FD करता तेव्हा त्यावर मिळणारे व्याज हे तुमचे उत्पन्न (income) मानले जाते. Income-tax Act 1961 च्या सेक्शन 194A अंतर्गत बँक या व्याजावर TDS कापते. मात्र जर व्याज ठराविक मर्यादेपेक्षा कमी असेल ( 50,000 किंवा 1,00,000) तर TDS कापला जात नाही.
advertisement
प्रश्न 2: नवीन कायद्यात गोंधळ का निर्माण झाला?
उत्तर: Income-tax Act 2025 मध्ये व्याजावरील TDS चा नियम सेक्शन 393(1) मध्ये दिला आहे. पण banking company ची व्याख्या सेक्शन 402 मध्ये वेगळ्या पद्धतीने दिली आहे. यात जुन्या कायद्याप्रमाणे सर्व बँकिंग संस्थांचा स्पष्ट उल्लेख नव्हता. त्यामुळे लोकांना वाटले की नियम बदलले आहेत.
प्रश्न 3: आधी आणि आता काय फरक दिसला?
उत्तर: पूर्वीच्या कायद्यात banking company मध्ये बँकांसोबत इतर अनेक बँकिंग संस्थाही समाविष्ट होत्या. पण नवीन कायद्यात हा उल्लेख स्पष्टपणे दिसत नसल्याने काही संस्थांना बाहेर ठेवले गेले असावे, अशी शंका निर्माण झाली.
प्रश्न 4: सरकारने काय स्पष्ट केले आहे?
उत्तर: सरकारने सांगितले आहे की नवीन कायद्यात सेक्शन 51 चा उल्लेख नसला, तरी Banking Regulation Act 1949 अंतर्गत येणाऱ्या सर्व बँका आणि संस्थांना banking company मध्येच गणले जाईल. म्हणजेच नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
प्रश्न 5: याचा तुमच्या FD वर काय परिणाम होईल?
उत्तर: जर तुमच्या FD वर मिळणारे व्याज ठराविक मर्यादेपेक्षा कमी असेल, तर बँक TDS कापणार नाही. म्हणजेच आधीसारखीच सवलत कायम राहील आणि विनाकारण कर कापला जाणार नाही.
प्रश्न 6: छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही मोठी बातमी का आहे?
उत्तर: बर्याच वेळा छोट्या गुंतवणूकदारांचा TDS कापला जातो आणि नंतर रिफंड मिळवण्यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागते. या स्पष्टीकरणामुळे अशा त्रासापासून बचाव होईल.
प्रश्न 7: बँकांसाठी काय बदलले?
उत्तर: बँकांसाठी आता नियम पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. त्यांना पूर्वीप्रमाणेच प्रणाली वापरायची आहे आणि ठराविक मर्यादेपेक्षा कमी व्याजावर TDS कापायचा नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की FD वरील TDS नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Income-tax Act 2025 मध्येही पूर्वीप्रमाणेच नियम लागू राहतील. ठराविक मर्यादेपर्यंत व्याजावर TDS कापला जाणार नाही.
TDS बद्दल मूलभूत माहिती
प्रश्न: TDS म्हणजे काय?
उत्तर: TDS म्हणजे Tax Deducted at Source म्हणजे तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम आधीच कर म्हणून कापली जाते आणि सरकारकडे जमा केली जाते.
प्रश्न: TDS कधी कापला जातो?
उत्तर: जेव्हा तुमचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असते तेव्हा TDS कापला जातो. उदाहरणार्थ:
पगार (Salary)
FD किंवा सेव्हिंग अकाउंटवरील व्याज
भाडे (Rent)
प्रोफेशनल फी किंवा कमिशन
प्रत्येक प्रकारासाठी वेगवेगळ्या मर्यादा आणि दर ठरवलेले असतात.
प्रश्न: TDS कसा कापला जातो?
उत्तर: ज्या व्यक्ती किंवा संस्थेकडून तुम्हाला पैसे मिळतात (उदा. बँक किंवा कंपनी), तीच TDS कापते.
उदाहरण: जर तुमच्या FD वर 60,000 व्याज मिळत असेल आणि मर्यादा 50,000 असेल तर बँक ठराविक दराने TDS कापून उर्वरित रक्कम तुम्हाला देईल. तसेच कंपनी तुमच्या पगारातून दरमहा TDS कापते.
प्रश्न: TDS का कापला जातो?
उत्तर: सरकारचा उद्देश असा आहे की कर वर्षाअखेर एकदाच न घेता, वर्षभरात हळूहळू गोळा करावा. यामुळे सरकारला नियमित उत्पन्न मिळते, करचोरी कमी होते आणि नागरिकांवर एकाच वेळी मोठा करभार पडत नाही
प्रश्न: TDS म्हणजे अंतिम कर असतो का?
उत्तर: नाही. TDS हा अॅडव्हान्स करासारखा असतो. वर्षाअखेर ITR भरताना अंतिम कर ठरतो.
जास्त TDS कापला असेल → रिफंड मिळतो
कमी कापला असेल → उर्वरित कर भरावा लागतो
प्रश्न: TDS टाळण्यासाठी काय करता येते?
उत्तर: जर तुमचे एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही बँकेत Form 15G किंवा 15H जमा करू शकता. त्यामुळे बँक TDS कापणार नाही.
प्रश्न: TDS कापला गेला तर काय करावे?
उत्तर: तुम्ही ITR (Income Tax Return) भरून रिफंड मागू शकता. सरकार ती रक्कम तुमच्या खात्यात परत करते.
