TRENDING:

LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं खास गिफ्ट

Last Updated:

LPG Gas Cylinder Price : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, महिला दिनी सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर कमी करण्याचा निर्णय घेतला.

advertisement
दिल्ली : महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीय. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती १०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, महिला दिनी सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबावरचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होतील. याचा आपल्या नारी शक्तीला फायदा होईल असंही मोदी म्हणाले.
News18
News18
advertisement

स्वयंपाकाचा गॅस स्वस्त करून कुटुंबाच्या कल्याणाचे आणि आरोग्यदायी वातावरण कायम ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. महिला सक्षमीकरण आणि त्यांच्यासाठी 'इज ऑफ लिव्हिंग' म्हणजेच आयुष्य सुकर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

उज्ज्वला योजना आणखी वर्षभर सुरू

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱे अनुदान २०२४-२५ मध्येही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान ३०० रुपये प्रति सिलिंडर इतकं आहे. याचा फायदा १० लाख लाभार्थ्यांना मिळेल. वर्षभरात १२ सिलिंडरवर अनुदान मिळणार आहे. दिल्लीत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा दर ९०३ रुपये इतका आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत हेच सिलिंडर ६०३ रुपयांना मिळेल.

advertisement

पंतप्रधान मोदींनी महिला दिनाच्या दिल्या शुभेच्छा

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. ते म्हणाले आपल्या नारी शक्तीच्या ताकदीला, धाडसाला सलाम. अनेक क्षेत्रात त्यांचे काम कौतुकास्पद असे आहे. सरकार शिक्षण, उद्योग, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात महिलांच्या सबलीकरणासाठी कटिबद्ध आहे. गेल्या दशकभरात सरकारने घेतलेल्या निर्णयातूनसुद्धा हे दिसते असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं खास गिफ्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल