TRENDING:

हेल्थ, टर्म इन्शुरन्सच्या GST रद्दची Inside Story, फायदा कोणाला मिळणार नाही? 5 प्रश्नात तुमचे सर्व कन्फ्यूजन मिटेल

Last Updated:

GST On Life Insurance: केंद्र सरकारने वैयक्तिक Health Insurance आणि Life Insurance पॉलिसींवरील GST पूर्णपणे रद्द केला. 22 सप्टेंबरनंतर नूतनीकरणावरच लाभ, ग्रुप पॉलिसींना सवलत नाही.

advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली : देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने वैयक्तिक आरोग्य (Health Insurance) आणि जीवन विमा (Life Insurance) पॉलिसींवर लागू असलेला जीएसटी (GST) पूर्णपणे रद्द केला आहे. आतापर्यंत या पॉलिसींवर 18% कर आकारला जात होता. मात्र आता पॉलिसीचा प्रीमियम थेट स्वस्त होणार आहे.

advertisement

नेमका बदल काय झाला?

वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी परिषदेच्या 56व्या बैठकीनंतर घोषणा केली की सर्व प्रकारच्या वैयक्तिक जीवन विमा पॉलिसींवर जसे टर्म इन्शुरन्स, युलीप (ULIP-Unit Linked Insurance Plan) आणि एन्डॉवमेंट पॉलिसीवर आता कोणताही जीएसटी आकारला जाणार नाही. तसेच फॅमिली फ्लोटर, ज्येष्ठ नागरिक आणि इतर वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसींवर देखील कर लागू होणार नाही.

advertisement

कोणाला फायदा होणार नाही?

ज्यांच्याकडे आधीपासून पॉलिसी आहे. त्यांना या करमाफीचा लाभ मिळणार नाही, कारण त्यांनी आधीच जीएसटी भरला आहे.

22 सप्टेंबरपूर्वी घेतलेल्या नवीन पॉलिसींवरही करमाफी लागू होणार नाही.

advertisement

मात्र जर तुमची पॉलिसी 22 सप्टेंबर किंवा त्यानंतर नूतनीकरण (Renewal) होत असेल. तर नूतनीकरणावर जीएसटीचा फायदा मिळेल.

हा फायदा फक्त वैयक्तिक पॉलिसींवरच लागू आहे. ग्रुप पॉलिसी अथवा इतर प्रकारच्या विम्यांवर जीएसटी माफी मिळणार नाही.

advertisement

पूर्वी विमा महाग का होता?

पूर्वी एखाद्या व्यक्तीने आरोग्य किंवा जीवन विमा घेतला. तर प्रीमियमवर थेट 18% जीएसटी जोडला जायचा. उदाहरणार्थ जर पॉलिसीचा प्रीमियम 10,000 असेल. तर ग्राहकाला अतिरिक्त 1,800 जीएसटी भरावा लागायचा. आता हा अतिरिक्त खर्च पूर्णपणे संपुष्टात आला आहे.

सामान्य लोकांना फायदा

सरकारचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे विमा पॉलिसी सामान्य माणसाच्या आवाक्यात येईल. यापूर्वी महागड्या प्रीमियममुळे अनेक लोक विमा घेण्यास कचरत होते. पण आता जास्त लोक आरोग्य व जीवन विमा घेतील.

विमा क्षेत्रात तेजी

जीएसटी हटवल्यामुळे विमा कंपन्यांना नवीन ग्राहक मिळतील. पॉलिसी कव्हरेज झपाट्याने वाढेल. तज्ज्ञांच्या मते येत्या काही वर्षांत भारतीय विमा बाजार (Insurance Market) अनेक पटीनं वाढण्याची शक्यता आहे.

जीएसटी परिषदेचा हा निर्णय विमा उद्योग आणि सामान्य नागरिक दोघांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. जरी जुन्या पॉलिसीधारकांना किंवा 22 सप्टेंबरपूर्वी घेतलेल्या पॉलिसींना करमाफीचा लाभ मिळणार नसला, तरी पुढे जाऊन जास्तीत जास्त लोक विमा घेतील आणि आरोग्य व जीवन विम्याचं कव्हरेज वाढेल.

प्रश्न 1 : जुन्या पॉलिसींवर जीएसटी सवलत मिळेल का?

उत्तर : नाही, जुन्या पॉलिसीधारकांना फायदा होणार नाही.

प्रश्न 2 : 22 सप्टेंबरपूर्वी घेतलेल्या पॉलिसींवर सुट मिळेल का?

उत्तर : नाही, नवीन नियम 22 सप्टेंबरपासून लागू होईल.

प्रश्न 3 : ही सवलत सर्व प्रकारच्या विम्यावर आहे का?

उत्तर : नाही, ही सवलत फक्त वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावर आहे.

प्रश्न 4 : ग्रुप पॉलिसींवर करमाफी मिळेल का?

उत्तर : नाही, ग्रुप पॉलिसींवर ही सुट लागू होणार नाही.

प्रश्न 5 : आता पॉलिसी घेण्याचा काय फायदा होईल?

उत्तर : प्रीमियम स्वस्त होईल आणि जास्त लोक विमा घेऊ शकतील.

मराठी बातम्या/मनी/
हेल्थ, टर्म इन्शुरन्सच्या GST रद्दची Inside Story, फायदा कोणाला मिळणार नाही? 5 प्रश्नात तुमचे सर्व कन्फ्यूजन मिटेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल