TRENDING:

म्हणे, IT मध्ये काम करणाऱ्यांना असतो भरपूर पगार, मग CEO किती घेतात? या कंपनीचा सीईओ सगळ्यात श्रीमंत

Last Updated:

एचसीएल टेक्नोलॉजीजचे सीईओ सी. विजयकुमार हे भारतातील सर्वाधिक वेतन घेणारे आयटी सीईओ आहेत. त्यांना आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान 94.6 कोटींचं पॅकेज मिळालं आहे.

advertisement
IT मध्ये काम करणाऱ्यांना खूप पगार मिळतो पण कधी विचार केलाय का CEO ला किती आणि कधी पगार असेल? भारतातील एक सीईओ असे आहेत जे दिवसाला 26 लाख रुपये कमवतात. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. भारताच्या आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेक्नोलॉजीजचे (HCLTech) मुख्य कार्यकारी अधिकारी सी. विजयकुमार हे आता देशातील सर्वाधिक वेतन घेणारे आयटी सीईओ ठरले आहेत.
News18
News18
advertisement

आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान त्यांना एकूण रुपये 94.6 कोटींचं पॅकेज मिळालं आहे. हे पॅकेज तब्बल 10 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक आहे, ज्यामुळे ते भारतात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आयटी प्रमुखांच्या यादीत अग्रेसर आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार विजयकुमार 15.8 कोटी रुपये बेसिक सॅलरी घेतात. तर परफॉर्मन्स बोनस 13.9 कोटी रुपये घेतात. 56.9 कोटींचे लॉन्ग-टर्म स्टॉक (RSU) आणि रुपये 1.7 कोटींचा इतर बोनस मिळाला आहे.

advertisement

सी. विजयकुमार यांनी 1994 मध्ये एचसीएल कॉमनेटमध्ये (HCL Comnet) एक वरिष्ठ अभियंता म्हणून करिअरला सुरुवात केली. ही कंपनी एचसीएल टेकची पूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी होती. त्यांचा रिमोट इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट मॉडेल स्थापन करण्यात मोठा वाटा होता. कंपनीच्या प्राथमिक टप्प्यातून सुरुवात करून ते सतत पुढे जात राहिले आणि शेवटी CEO पदापर्यंत पोहोचले.

advertisement

2016 मध्ये पहिल्यांदा CEO, आता दुसऱ्यांदा संधी

विजयकुमार यांची ऑक्टोबर 2016 मध्ये पहिल्यांदा CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. नंतर जुलै 2021 मध्ये त्यांना कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर ही जबाबदारीही देण्यात आली, जेव्हा संस्थापक शिव नाडर यांनी मुख्य रणनीती अधिकारी पद सोडलं. आता कंपनीने जाहीर केलं आहे की, 1 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2030 दरम्यान ते पुन्हा एकदा CEO आणि MD म्हणून काम पाहतील. मात्र, याला शेअरहोल्डर्सची मान्यता आवश्यक आहे.

advertisement

तांत्रिक शिक्षण तमिळनाडूमधून

विजयकुमार यांनी तमिळनाडूतील PSG College of Technology मधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयरिंगची पदवी घेतली आहे. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळेच ते कंपनीतील विविध टप्प्यांवर यशस्वी ठरले आहेत.

इतर आयटी प्रमुखांची वेतन तुलना

एचसीएल टेकच्या विजयकुमार यांचे वेतन देशातील इतर आयटी प्रमुखांपेक्षा खूपच जास्त आहे. इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांना रुपये 80.6 कोटी, TCS चे के. कृतिवासन यांना 26.5 कोटी रुपये, विप्रोचे श्रीनिवास पल्लिया यांना 53.6 कोटी रुपये आणि टेक महिंद्राचे मोहित जोशी यांना 53.9 कोटींचं पॅकेज आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
म्हणे, IT मध्ये काम करणाऱ्यांना असतो भरपूर पगार, मग CEO किती घेतात? या कंपनीचा सीईओ सगळ्यात श्रीमंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल