TRENDING:

Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली तर काय होईल? अवघ्या 33 किमीच्या मार्गामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर कसा होईल परिणाम

Last Updated:

नुकतेच Iraqच्या किनारपट्टीजवळ दोन तेल टँकर्सवर अज्ञात क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे या भागातील सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. इराणने या मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला 'आग लावण्याचा' इशारा दिला आहे, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे

advertisement
मुंबई : जगभरात कच्च्या तेलाची वाहतूक मुख्यतः समुद्री मार्गाने केली जाते. मध्य पूर्वेतून जगातील अनेक देशांना तेल पोहोचवण्यासाठी काही महत्त्वाचे समुद्री मार्ग वापरले जातात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा आणि व्यस्त मार्ग म्हणजे Strait of Hormuz. हा अरुंद समुद्री मार्ग पर्शियन गल्फमधील तेल जगभर पोहोचवण्याची मोठी जबाबदारी सांभाळतो. अशा या महत्त्वाच्या मार्गात सध्या गंभीर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच Iraqच्या किनारपट्टीजवळ दोन तेल टँकर्सवर अज्ञात क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे या भागातील सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. इराणने या मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला 'आग लावण्याचा' इशारा दिला आहे, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे?

खरंतर हा जलमार्ग आखाती देशाला थेट अरबी समुद्राशी जोडतो. याच्या उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान आणिसंयुक्त अरब अमिराती (UAE) आहेत.

या मार्गाची रुंदी प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी 50 किलोमीटर असली तरी, सर्वात अरुंद भागातून प्रवास केला तर तो केवळ 33 किलोमीटर आहे. त्यामुळे जहाजांना फिरून यायला लागत नाही, यामुळे वेळ तरच वाचतोच शिवाय जहाजांना लागणारं इंधन देखील वाचतं. आश्चर्य म्हणजे एवढा अरुंद असूनही हा मार्ग इतका खोल आहे की जगातील सर्वात मोठे तेल टँकर्स येथून सहज जाऊ शकतात.

advertisement

600 अब्ज डॉलर्सचा व्यापार

2025 च्या अंदाजानुसार, येथून दररोज सुमारे 2 कोटी बॅरल तेल वाहून नेले जाते, जे वार्षिक सुमारे 600 अब्ज डॉलर्सच्या ऊर्जा व्यापाराच्या बरोबरीचे आहे

जगातील 20% तेल: जगातील सुमारे 20% तेल सामान्यतः याच सामुद्रधुनीतून जाते.

हे तेल केवळ इराणचे नसून इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईमधूनही येते.

advertisement

मार्ग 'व्यावहारिकदृष्ट्या बंद' आणि महागाईचा भडका

सध्या या मार्गावर कोणतीही थेट लष्करी नाकेबंदी नसली तरी, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या भीतीमुळे टँकर्स या मार्गाचा वापर करणे टाळत आहेत.

ग्लोबल रिस्क मॅनेजमेंटचे मुख्य विश्लेषक आर्ने लोहमन रासमुसेन यांच्या मते, "हा मार्ग व्यावहारिकदृष्ट्या बंदच आहे, कारण येथून जाण्याची कोणीही हिंमत करत नाहीये" जहाजांना एकतर विमा मिळत नाहीये किंवा तो परवडण्यापलीकडे आहे, म्हणजे खूपच महाग झाला आहे

advertisement

या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम दिसत आहे

युद्धाच्या परिस्थितीमुळे तेलाच्या किमती प्रति बॅरल 120 डॉलर्सच्या घरात पोहोचल्या होत्या

मध्यपूर्वेकडून चीनकडे सुपरटँकर भाड्याने घेण्याचा खर्च एका आठवड्यात दुप्पट होऊन 4,00,000 डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे

आशिया आणि जगावर होणारा परिणाम

या नाकेबंदीचा सर्वात मोठा फटका आशियाई देशांना बसणार आहे. 2022 च्या आकडेवारीनुसार, होर्मुझमधून जाणारे सुमारे 82% कच्चे तेल आशियाई देशांमध्ये जाते

advertisement

इराण जागतिक बाजारात जे तेल विकतो, त्यापैकी तब्बल 90% तेल एकटा चीन खरेदी करतो. चीन या तेलाचा वापर करून वस्तू बनवतो आणि जगभरात निर्यात करतो. त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्यास जगभरातील ग्राहकांसाठी सर्वच वस्तू महाग होतील आणि महागाई वाढेल

इराणची लष्करी रणनीती आणि 1980 चे 'टँकर युद्ध'

संयुक्त राष्ट्रांच्या नियमांनुसार, समुद्रात 12 नॉटिकल मैलांपर्यंत (13.8 मैल) देशांचे नियंत्रण असते. होर्मुझचा सर्वात अरुंद भाग पूर्णपणे इराण आणि ओमानच्या सागरी हद्दीत येतो तज्ज्ञांच्या मते, हा मार्ग रोखण्यासाठी इराण वेगवान नौका, पाणबुड्या आणि समुद्रातील सुरुंगांचा वापर करू शकतो. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अमेरिकन लष्कराने नुकतेच इराणची सुरुंग पेरणारी 16 जहाजे 'नष्ट' केल्याचे जाहीर केले आहे

सध्याची ही भीषण परिस्थिती 1980 च्या दशकातील इराण-इराक युद्धादरम्यान झालेल्या 'टँकर युद्धा'ची (Tanker War) आठवण करून देते. त्यावेळी दोन्ही देशांनी आर्थिक दबाव आणण्यासाठी व्यापारी जहाजांवर हल्ले केले होते, ज्यामुळे कुवेती टँकर्सच्या संरक्षणासाठी अमेरिकन युद्धनौकांना आखातात उतरावे लागले होते.

मराठी बातम्या/मनी/
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली तर काय होईल? अवघ्या 33 किमीच्या मार्गामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर कसा होईल परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल