जागतिक अर्थकारणात आपल्या देशाला विशेष स्थान
जागतिक अर्थकारणात, राजकारणात, समाजकारणात आपल्या देशाला एक विशेष स्थान आहे.
कोरोनाचे संधीमध्ये रूपांतर
विशेषतः कोरोना काळानंतर ज्या पद्धतीने भारताच्या अर्थकारणात बदल झाला आहे तो लक्षणीय आहे. कोरोनात इतर देश आर्थिक संकटात असताना भारताने मात्र या काळाचे संधीमध्ये रूपांतर केले. त्यामुळे ज्या देशाच्या अर्थकारण वाढत आहे त्या देशावर या सर्व गोष्टींचा परिणाम होणे साहजिक असल्याची माहिती टिळक यांनी दिली.
advertisement
खासगी नोकरी करताय, तर बँक अकाऊंटमध्ये ठेवा इतके पैसे, नाहीतर येईल मोठं संकट!
आता युद्धाच्या चर्चा अधिक होतात
युद्ध काही पहिल्यांदा होत नाही किंवा शेअर बाजारही नुकताच सुरू झालेला नाही. मात्र सुरुवातीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणत चर्चा होत नसतं आता त्या होऊ लागल्या आहेत. मात्र आपण इतिहास पाहिला तर ज्या ज्या वेळी जगात युद्ध झालं त्या त्यावेळी शेअर बाजारावर त्याचा परिणाम झालेला पहिला मिळाला आहे.
रशिया बरोबर आयात निर्यात अधिक
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश भारताच्या भौगोलिक दृष्ट्या अधिक जवळ आहेत तितके हमास किंवा इस्त्राईल नाही. रशियाशी आपले संबंध देश स्वतंत्र झाल्यापासून चांगले आहेत. सुरुवातीपासूनच आपल्या आर्थिक धोरणामध्ये रशियाचा प्रभाव चीनपेक्षाही अधिक होता. जागतिक व्यापारात गेल्या 40 ते 50 वर्षात रशिया बरोबर आयात निर्यातीचा व्यापार अधिक होतो. इतकेच नव्हे तर तेलाच्या बाबतीत सध्या राशीत भारताचा मोठा पुरवठादार आहे. म्हणून रशिया आणि युक्रेनच्या युद्धात भारतीय शेअर मार्केटवर अधिक परिणाम झालेला पहिला मिळालं.
Israel-Hamas War : दीर्घ काळ चाललं युद्ध तर रॉकेट बनतील या कंपन्यांचे शेअर! पाहा का येईल तेजी
इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन बरोबर व्यापारी संबंध नाहीत
पॅलेस्टाईनशी आपले कोणतेही व्यापारी संबंध नाहीत. तर इस्त्राईलमध्ये आपल्याकडील अदानीसारख्या काही समूहाच्या कंपन्या आहेत. काही बँकाच्या शाखा आहेत. काही बंदर आहेत. मात्र असे असले तरी कितीतरी मोठ्या प्रमाणत रशियाशी आपले व्यापारी संबंध आहेत. सध्या शेअर बाजारावर परिणाम कमी होणे ही तात्कालिक प्रक्रिया असू शकते. युद्धाची व्याप्ती ज्याप्रमाणे लांबत जाईल त्याप्रमाणे परिणाम पाहिला मिळू शकतात, अशी माहिती चंद्रशेखर टिळक यांनी सांगितले.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा