Israel-Hamas War : दीर्घ काळ चाललं युद्ध तर रॉकेट बनतील या कंपन्यांचे शेअर! पाहा का येईल तेजी

Last Updated:

Israel-Hamas War Impact: एकटा इस्रायल जगाच्या 30 टक्के ब्रोमिनचा पुरवठा करतो. भारतातही गुजरातच्या कच्छमध्ये ब्रोमीनचे उत्पादन होते, परंतु हे प्रमाण इस्रायलच्या तुलनेत खूपच कमी आहे. ब्रोमिनचा पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने काही शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

स्टॉक मार्केट
स्टॉक मार्केट
Israel-Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध लांबले तर काही केमिकल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होऊ शकते. गेल्या 2 दिवसांपासून केमिकल कंपन्यांचे शेअर्सही वेगाने वाढत आहेत. काही केमिकल स्टॉक्समध्ये तेजीचं कारण म्हणजे इस्रायलमधून येणाऱ्या ब्रोमिन नावाच्या रसायनाच्या पुरवठ्यात व्यत्यय येण्याची भीती. इस्रायल हा ब्रोमिनचा प्रमुख निर्यातदार आहे. जगातील 30 टक्के ब्रोमिन फक्त इस्रायलमधून येते. हे केमिकल ब्रामीन पीरियाडिक टेबलमध्ये 35 व्या नंबरवर येते आणि त्याचे सिंबल Br’ असते.
हमासने इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात ब्रोमिनच्या किमती वाढल्या आहेत. केमिकल सेक्टरच्या कंपन्यांना त्याचा प्रभाव जाणवत आहे. ब्रोमाइन हे केमिकलचे निगेटिव्ह चार्ज केलेले रुप असते, म्हणजे BR-. त्याला ब्रोमाइड देखील म्हणतात. अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. विशेषत: मिर्गी किंवा एंग्जायटी उपचारांसाठी बनवलेल्या औषधांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
advertisement
बहुतेक ब्रोमिन मृत समुद्रातून येते
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, इस्रायल, पॅलेस्टाईनचा वेस्ट बँक आणि जॉर्डनच्या सीमेदरम्यान एक खूप मोठा तलाव आहे, ज्याला मृत समुद्र म्हणतात. हे जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. जगातील सुमारे 50 ते 55 टक्के ब्रोमिन या मृत समुद्रात आढळते. हा समुद्र इस्रायलच्या सीमेवर असल्याने त्याचा बहुतांश भाग त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे.
advertisement
या शेअर्सवर ब्रोकरेज तेजीत आहे
केमिकल सेक्टरची सध्याची परिस्थिती पाहता ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने गुंतवणूकदारांना SRF, दीपक नाइट्राइट आणि आर्चेन केमिकलचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेएफ फायनान्शिअलने SRF शेअर्सची टार्गेट प्राइज 2,230 रुपये, दीपक नायट्रेटची 2,066 रुपये आणि आर्चेन केमिकलची 628 रुपये ठरवली आहे. याशिवाय, ब्रोकरेज फर्मने यूपीएल, पीयू इंडस्ट्रीज, क्लीन सायन्स, नवीन फ्लोरिन आणि एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर आपले 'बाय' रेटिंग देखील कायम ठेवले आहे.
advertisement
जेएम फायनान्शिअलने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलेय की, इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ब्रोमिनचे उत्पादन, त्याची विक्री आणि परदेशात निर्यातीबाबत चिंता निर्माण झाली आहे. युद्धामुळे ब्रोमिनच्या निर्यातीत घट झाली तर त्याची किंमत झपाट्याने वाढेल. सध्या ब्रोमिनचा भाव 290 रुपये प्रति किलो इतका आहे.
(Disclaimer: येथे सांगितलेले स्टॉक ब्रोकरेज हाऊसेसच्या सल्ल्यावर आधारित आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणत्याहीमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर प्रथम एखाद्या सर्टिफाइड इनव्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्या. तुमच्या नफा किंवा तोट्यासाठी News18 जबाबदार नाही. )
मराठी बातम्या/मनी/
Israel-Hamas War : दीर्घ काळ चाललं युद्ध तर रॉकेट बनतील या कंपन्यांचे शेअर! पाहा का येईल तेजी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement