TRENDING:

Aadhaar Card Update : फ्रीमध्ये कसा करायचा आधार कार्ड अपडेट? स्टेप बाय स्टेप समजून घ्या

Last Updated:

आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने अलीकडेच आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. याचा अर्थ असा की तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अजून वेळ आहे.

advertisement
मुंबई : आधार कार्ड हे आता प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाचं कागदपत्र आहे. कोणत्याही सरकारशी संबंधीत गोष्टींसाठी आधार कार्डची आवश्यकता असते. मग ते बँकेत खाते उघडणे असोत किंवा मग शाळा- कॉलेजला एडमिशन घेणे असोत, एवढच काय तर नोकरी करताना देखील आधार कार्ड ओळखपत्र म्हणून द्यावे लागते.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

या कार्डच्या मदतीने तुम्ही सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे आधार कार्डची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.

अनेकदा ह्या ना त्या कारणांमुळे आधार कार्डशी संबंधीत गोष्टी बदलतात, त्यामुळे त्यांचे अपडेट करणे गरजेचे आहे. जसे की तुमचा पत्ता, बरोबर असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही अलीकडे तुमचा पत्ता बदलला असेल, तर तुम्ही तुमचा पत्ता तुमच्या आधार कार्डमध्ये लवकरात लवकर अपडेट करून घ्यावा. यामुळे तुम्हाला सरकारी सेवांचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे आता ह्यासाठी तुम्हाला पैसे मोजण्याची गरज नाही. तुम्ही आधार कार्ड अपडेट फ्रीमध्ये करू शकता. ते कसं करायचं हे स्टेप बाइ स्टेप समजून घेऊ.

advertisement

Aadhar card अपडेट करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक ऑनलाइन आणि दुसरी ऑफलाइन.

ऑनलाइन पद्धत

1. तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर UIDAI वेबसाइटवर जा.

2. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

3. यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेल्या OTP सह लॉग इन करा.

4. त्यानंतर "अपडेट ॲड्रेस इन आधार" पर्यायावर क्लिक करा.

advertisement

5. तुमचा नवीन पत्ता येथे काळजीपूर्वक भरा.

6. तुमच्या नवीन पत्त्याचे कोणतेही एक प्रमाणपत्र स्कॅन करा आणि अपलोड करा. जसे की पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, मतदार ओळखपत्र किंवा वीज बिल.

7. सर्व माहिती भरल्यानंतर, सबमिट करण्यापूर्वी एकदा ती तपासा.

8. सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक सेवा विनंती क्रमांक (SRN) मिळेल जो तुम्ही तुमच्या अपडेटच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी वापरू शकता.

advertisement

ऑफलाइन पद्धत

1. UIDAI वेबसाइटवरून तुमचे जवळचे नावनोंदणी केंद्र शोधा.

2. आधार केंद्रावर जा आणि आधार अपडेट फॉर्म भरा.

3. तुमच्या नवीन पत्त्याचे एक प्रमाणपत्र सोबत घ्या. जसे की पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, मतदार ओळखपत्र किंवा वीज बिल.

4. केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणीद्वारे तुमची ओळख सत्यापित करा.

5. ऑफलाइन अपडेटसाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

advertisement

6. सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल जो तुम्ही तुमच्या अपडेटच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी वापरू शकता.

आधार अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे

1. पासपोर्ट

2. बँक स्टेटमेंट किंवा पासबुक

3. मतदार ओळखपत्र

4. ड्रायव्हिंग लायसन्स

5. वीज बिल, पाणी बिल किंवा टेलिफोन बिल

6. मालमत्ता कराची पावती

7. रेशन कार्ड

8. पेन्शन कार्ड.

आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने अलीकडेच आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. याचा अर्थ असा की तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अजून वेळ आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचा पत्ता ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अपडेट करू शकता.

मराठी बातम्या/मनी/
Aadhaar Card Update : फ्रीमध्ये कसा करायचा आधार कार्ड अपडेट? स्टेप बाय स्टेप समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल