TRENDING:

YouTube वर एकही व्हिडिओ अपलोड करू नका; कोणाला कोटी, कोणाला दमडीही नाही, खरा खेळ इथे होता

Last Updated:

Understanding YouTube: YouTube वर लाखो लोक व्हिडिओ अपलोड करतात, पण काहीजण कोट्यवधी कमावतात तर काहींना दमडीही मिळत नाही. यामागे मेहनतीपेक्षा वेगळीच रणनीती, कंटेंटची दिशा आणि YouTube चा खरा गेम दडलेला आहे.

advertisement
News18
News18
advertisement

आज YouTube वर अनेक लोक मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसतात. हे पाहून बरेच जण उत्साहाने आपला यूट्यूब चॅनल सुरू करतात. मात्र वास्तव असे आहे की, हजारो लोकांचे चॅनल सुरू असूनही ते कधीच मोनेटाइज होत नाहीत आणि कमाई तर दूरचीच गोष्ट ठरते. मग प्रश्न पडतो काही लोकांचे चॅनल प्रचंड लोकप्रिय कसे होतात, तर काहींचे चॅनल वर्षानुवर्षे मोनेटाइजही का होत नाहीत?

advertisement

यामागचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही टाकत असलेला कंटेंट आणि तुमचा चॅनल चालवण्याची पद्धत. तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल सुरू करणार असाल, किंवा आधीच चॅनल असूनही मोनेटाइजेशन मिळाले नसेल, तर योग्य दिशेने सुरुवात करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

advertisement

योग्य टॉपिकची निवड करा

सर्वात आधी योग्य विषय निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय बनवायचे आहे, यापेक्षा लोकांना काय पाहायला आवडते हे अधिक महत्त्वाचे ठरते. ज्या विषयांवर लोकांची उत्सुकता जास्त आहे आणि ज्याची जाहिरात (Ad Value) चांगली आहे, अशा मुद्द्यांवर व्हिडीओ तयार करा. भारतात विशेषतः टेक्नॉलॉजी, फायनान्स, एज्युकेशन आणि हेल्थ या विषयांवरील व्हिडीओंवर चांगली कमाई होते.

advertisement

मोनेटाइजेशनसाठी काय अटी आहेत?

जर तुमच्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचा, एकमेकांशी संबंध नसलेला कंटेंट असेल, तर प्रेक्षक गोंधळात पडू शकतात. यूट्यूब चॅनल मोनेटाइज होण्यासाठी सध्या किमान 500 सब्सक्रायबर्स आणि 3,000 तासांचा वॉच टाइम आवश्यक आहे.

advertisement

जर तुम्ही फक्त शॉर्ट्स बनवत असाल, तर 90 दिवसांत किमान 30 लाख व्ह्यूज असणे गरजेचे आहे. या अटी पूर्ण झाल्याशिवाय मोनेटाइजेशन मिळत नाही.

लॉन्ग फॉर्मेट व्हिडीओवर भर द्या

वॉच टाइम वाढवण्यासाठी लॉन्ग फॉर्मेट व्हिडीओ अधिक उपयुक्त ठरतात. साधारणपणे 6 ते 10 मिनिटांचे व्हिडीओ बनवू शकता. शॉर्ट्सचा वापर मुख्यतः रीच वाढवण्यासाठी करावा. शॉर्ट्समुळे तुमचे व्हिडीओ अधिक लोकांपर्यंत पोहोचतात आणि सब्सक्रायबर्सही वेगाने वाढतात. लक्षात ठेवा, यूट्यूब व्ह्यूजवर नाही तर वॉच टाइमवर पैसे देते.

थंबनेल बनवताना विशेष काळजी घ्या

व्हिडीओ किती चांगला आहे, हे प्रेक्षक थंबनेल पाहून ठरवतात. त्यामुळे थंबनेल असे असावे की ते पाहणाऱ्याला व्हिडीओवर क्लिक करायला भाग पाडेल. थंबनेलमध्ये 3 ते 4 शब्दांपेक्षा जास्त मजकूर नसावा, भावनांचा (Emotion) प्रभाव जास्त दिसावा आणि टेक्स्ट कमीत कमी असावा. उदाहरणार्थ:iPhone 15 Reviewअसा साधा टायटल देण्याऐवजी, “80,000 चा iPhone… ही चूक करू नका” असे कुतूहल निर्माण करणारे टायटल आणि थंबनेल अधिक परिणामकारक ठरते.

सातत्य (Consistency) ठेवा

अनेक लोक एक-दोन व्हिडीओ टाकल्यानंतर थांबतात, हीच सर्वात मोठी चूक असते. आठवड्याला किमान 2 ते 3 व्हिडीओ टाका आणि अपलोड करण्याची वेळ नेहमी एकसारखी ठेवा. जर तुम्ही 60 ते 90 दिवस सातत्याने हे पाळले, तर त्याचा नक्कीच फायदा होतो. यूट्यूब सुरुवातीला नवीन चॅनलटेस्ट’ करतो आणि नंतरच त्याला मोठ्या प्रमाणात पुश करतो.

सब्सक्रायबर्स कसे वाढतील?

सब्सक्रायबर्स वाढवण्यासाठी शॉर्ट्सचा प्रभावी वापर करा. तुमच्या लॉन्ग व्हिडीओमधून छोटे-छोटे शॉर्ट्स तयार करू शकता. त्या शॉर्ट्सच्या कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण व्हिडीओचा लिंक द्या. याशिवाय SEO (Search Engine Optimization) कडेही लक्ष द्या. टायटलमध्ये योग्य कीवर्ड वापरा आणि डिस्क्रिप्शनच्या पहिल्या दोन ओळींमध्ये महत्त्वाचे कीवर्ड नक्की टाका.

YouTube वर कोणताही शॉर्टकट नाही

एकूणच पाहता YouTube Monetization साठी कोणताही शॉर्टकट नाही. योग्य प्लॅनिंग, योग्य कंटेंट आणि सातत्याने मेहनत केली, तरच यश मिळते. जर तुम्ही 3 ते 6 महिने योग्य दिशेने आणि नियमितपणे काम केले, तर तुमचा चॅनल सहजपणे मोनेटाइज होऊ शकतो.

मराठी बातम्या/मनी/
YouTube वर एकही व्हिडिओ अपलोड करू नका; कोणाला कोटी, कोणाला दमडीही नाही, खरा खेळ इथे होता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल