भारत संपत्तीचा केंद्रबिंदू
नाइट फ्रँकच्या अहवालानुसार भारत आता 191 अरबपतींचा देश बनला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच 26 नवीन व्यक्ती या यादीत समावेश झाला आहे. तर 2019 मध्ये ही संख्या केवळ 7 होती. भारतातील श्रीमंतांची संख्या ही आर्थिक विकास, वाढते गुंतवणुकीचे संधी आणि वाढणारे लक्झरी मार्केट वाढत असल्याची लक्षणे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
advertisement
शेअर बाजार पॅनिक, स्वस्तात मिळाले म्हणून 1661 कोटीचे शेअर्स घेतले, बसला तडाखा
भारतीयीची संपत्ती 950 अब्ज डॉलर्स
संपत्तीच्या बाबतीत भारताने जागतिक स्तरावर तिसरे स्थान मिळवले आहे. भारतीय अरबपतींची एकूण संपत्ती सुमारे 950 अब्ज डॉलर्स (सुमारे 82.65 लाख कोटी रुपये) आहे. अमेरिका (5.7 ट्रिलियन डॉलर्स) आणि चीन (1.34 ट्रिलियन डॉलर्स) हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
कुटुंबाचे पैसे बुडाले,1 हजार 760 कोटींचे नुकसान; गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा
भारतीय श्रीमंतांच्या गुंतवणुकीत बदल
नाइट फ्रँक इंडियाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर शिशिर बैजल यांच्या मते, भारतातील संपत्ती वाढ हे देशाच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीचे संकेत आहेत. भारतीय अरबपती आता केवळ रिअल इस्टेटपुरते मर्यादित न राहता इक्विटी आणि इतर संपत्ती प्रकारांमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. या बदलांमुळे येत्या दशकात जागतिक संपत्ती निर्मितीत भारताची भूमिका आणखी महत्त्वाची ठरणार आहे.