TRENDING:

गॅस सिलेंडर, पेट्रेल-डिझेलची कोंडी फुटली; पुढच्या 2 महिन्याचे टेन्शन मिटले, पुरवठ्याचे 101% नियोजन, सरकारचा मोठा निर्णय

Last Updated:

Crude Oil and LPG Supplies: होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारताचा कच्चे तेल आणि एलपीजी पुरवठा सुरक्षित असल्याचा सरकारचा दावा आहे. पुढील 60 दिवसांसाठी पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

advertisement
नवी दिल्ली: इराण युद्धामुळे देशात सध्या गॅस आणि पेट्रोलच्या संभाव्य टंचाईच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी लोकांनी गॅस सिलिंडर आणि इंधन साठवण्यास सुरुवात केली असून काही भागांत रांगा आणि तात्पुरती कमतरता जाणवत आहे. वाढत्या अफवा, आंतरराष्ट्रीय तणाव आणि पुरवठ्याबाबतच्या अनिश्चिततेमुळे सर्वसामान्य नागरिकांवर मानसिक व आर्थिक ताण वाढला आहे. ज्यामुळे दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. या सर्व गोंधळाच्या परिस्थितीत केंद्र सरकारने एक मोठी अपडेट दिली आहे.
News18
News18
advertisement

भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा साठा पुढील 60 दिवसांसाठी सुरक्षित करण्यात आला असून होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद झाल्यामुळे पुरवठ्यात काही अडथळे आले असले तरी पश्चिम देशांकडून वाढीव खरेदीमुळे त्याची भरपाई झाली आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने 26 मार्च रोजी दिली.

होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती असूनही भारताला आज जगभरातील 41 पेक्षा अधिक पुरवठादारांकडून पूर्वीपेक्षा अधिक कच्चे तेल मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः पश्चिम गोलार्धातून उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणातील पुरवठ्यामुळे कोणतीही कमतरता भरून निघाली आहे, असे मंत्रालयाने सांगितले.

advertisement

सरकारने हेही स्पष्ट केले की देशातील सर्व रिफायनरी 100 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने कार्यरत आहेत आणि भारतीय तेल कंपन्यांनी पुढील 60 दिवसांसाठी कच्च्या तेलाचा पुरवठा आधीच निश्चित करून ठेवला आहे. पुरवठ्यात कोणतीही तूट नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

भारताकडे फक्त 6 दिवसांचा साठा असल्याच्या बातम्यांना फेटाळून लावत मंत्रालयाने सांगितले की देशाची एकूण साठवण क्षमता 74 दिवसांची आहे आणि सध्या प्रत्यक्ष साठा सुमारे 60 दिवसांचा आहे. यामध्ये कच्च्या तेलाचा साठा, पेट्रोलियम उत्पादनांचा साठा आणि गुहांमध्ये ठेवलेला धोरणात्मक (strategic) साठा यांचा समावेश आहे. पश्चिम आशियातील संकट सुरू होऊन 27 दिवस झाले असतानाही हा साठा उपलब्ध आहे.

advertisement

मंत्रालयाने नमूद केले की जागतिक परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जवळपास दोन महिन्यांचा स्थिर पुरवठा उपलब्ध आहे. पुढील दोन महिन्यांसाठी कच्च्या तेलाची खरेदी देखील निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील अनेक महिन्यांसाठी भारत पूर्णपणे सुरक्षित आहे आणि अशा परिस्थितीत धोरणात्मक साठ्याचे महत्त्व दुय्यम ठरते, असे मंत्रालयाने म्हटले.

एलपीजी पुरवठ्याबाबत महत्त्वाची माहिती

advertisement

मंत्रालयाने जारी केलेल्या LPG नियंत्रण आदेशानंतर देशांतर्गत रिफायनरी उत्पादनात 40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दररोजचे LPG उत्पादन 50,000 मेट्रिक टनांवर पोहोचले असून, हे देशाच्या एकूण सुमारे 80,000 मेट्रिक टनांच्या गरजेपैकी 60 टक्क्यांहून अधिक आहे.

यामुळे देशाची दररोजची निव्वळ आयात गरज केवळ 30,000 मेट्रिक टनांवर आली आहे. म्हणजेच भारत आता आयातीपेक्षा अधिक उत्पादन करत आहे, असे सरकारने स्पष्ट केले.

advertisement

देशांतर्गत उत्पादनाव्यतिरिक्त 8 लाख (800,000) मेट्रिक टन LPGचा निश्चित पुरवठा आधीच सुरक्षित करण्यात आला असून तो अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांकडून भारताकडे येत आहे. हे मालवाहू भारतातील 22 LPG आयात टर्मिनल्सवर येणार आहेत आणि ते 2014 मध्ये असलेल्या 11 टर्मिनल्सच्या दुप्पट.

सरकारने सांगितले की सध्या एक महिन्याचा पूर्ण पुरवठा निश्चित करण्यात आला आहे आणि अतिरिक्त खरेदी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. तेल कंपन्या दररोज 50 लाखांहून अधिक गॅस सिलिंडर यशस्वीरित्या वितरित करत आहेत. ग्राहकांच्या घबराटीमुळे मागणी 89 लाख सिलिंडरपर्यंत वाढली होती, मात्र आता ती पुन्हा 50 लाखांवर आली आहे. साठेबाजी आणि काळाबाजार टाळण्यासाठी राज्य सरकारांच्या सल्ल्याने व्यावसायिक सिलिंडरचा कोटा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

मराठी बातम्या/मनी/
गॅस सिलेंडर, पेट्रेल-डिझेलची कोंडी फुटली; पुढच्या 2 महिन्याचे टेन्शन मिटले, पुरवठ्याचे 101% नियोजन, सरकारचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल